बाॅलिवूडच्या टाॅप आणि सुंदर अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टची गणना केली जाते. कमी वयात आलियाने स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. आलियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप ओळख निर्माण केली आहे. ‘बबली गर्ल’ आलिया सर्वांनाच तिच्या लुक्सने नेहमीच घायाळ करत असते. आलिया सोशल मीडिआवर सतत सक्रिय असते. तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
आलिया भट्ट (Alia Bhatt) आता तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांंपूर्वी या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे. तिच्या या गाण्याला लोकांंनी भरभरुन प्रतिसात दिला. तिचे हे गाणं सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. ‘तुम क्या मिले’ हे गाण काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. आलिया भट्टला फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या खास स्टाइलसाठी ओळखली जाते.
साडीपासून बिकिनीपर्यंत सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये ती स्वत:ला उत्तम प्रकारे हाताळते. ती तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चत येते. आलियाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत.
या फोटोंमध्ये आलिया एका कार्यक्रमासाठी तयार झालेली दिसत आहे. तिचा हा फॉर्मल लूक चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये तिने गडद निळ्या रंगाचा पँटसूट घातला आहे. हा सूट प्रसिद्ध फॅशन डिझायनर हेलन अँथनी यांनी डिझाइन केलेला आहे. फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कालची रात्र” त्याचवेळी आलियाने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
या फोटोंवर आलियाच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षीव केला आहे. कमेंट करताना एकाने लिहिले की, “विश्वातील सर्वात छान आणि सुंदर अभिनेत्रीची सर्वोत्तम फोटो.” दुसऱ्याने लिहिले की, “बॉस लेडी.” आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Actress Alia Bhatt’s latest photoshoot in formal dress goes viral)
अधिक वाचा-
–मुस्लिमांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या प्रश्नावर अखेर हुमाने दिले सड्डेताेड उत्तर, म्हणाली, ‘भारतात राहत असताना मला…’
–नेहा मलिकचा बोल्ड आणि मादक अंदाज पाहिलात का? पाहा फोटो