Friday, May 24, 2024

अभिनेत्री तर अविवाहित, मग बाळ कुणाचं? आम्रपालीच्या कुशीत चिमुकल्याला पाहून चाहत्याने विचारला प्रश्न

भोजपुरी कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या आगामी सिनेमामुळे, कधी त्यांच्या गाण्यामुळे, तर कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून माध्यमांचे लक्ष वेधतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून सध्या भलतीच चर्चेत आहे. ती अभिनेत्री म्हणजेच भोजपुरी सिनेमाची युट्यूब क्वीन आम्रपाली दुबे होय. आम्रपालीचा खूपच मोठा चाहतावर्ग आहे. तिला इंस्टाग्रामवर २९ लाख चाहते फॉलो करतात. तिच्या कोणत्याही पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. अशात तिचा एक फोटो सध्या चांगलेच लक्ष वेधत आहे.

अभिनेत्री आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, हा फोटो गायक आणि रितेश पांडे (Ritesh Pandey) याने शेअर केला आहे. या फोटोत रितेश आणि आम्रपाली दिसत आहेत. तसेच, त्यांच्यासोबत एक गोड बाळही दिसत आहे. हा फोटो पाहून चाहतेही प्रश्नांचा भडीमार करत आहेत. तसेच, लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना कोड्यात पाडत आहे. चाहते फोटो आणि लहान बाळाला अभिनेत्यासोबत जोडत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत दिसते की, आम्रपाली दुबे लाल रंगाच्या साडीत दिसत आहे आणि तिच्या कुशीत लहान बाळही दिसत आहे. त्या बाळाकडे ती एकटक पाहत आहे आणि प्रेमाचा वर्षावही करत आहे. तिच्या बाजूला अभिनेता रितेश पांडेही बसला आहे. तो एकदम कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. रितेशने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कनवा में सोभे बाली.” खरं तर, हे कॅप्शन एका गाण्याचे गीत आहेत.

या फोटोला आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत. या फोटोवर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “कोणाचे बाळ आहे?” तसेच, दुसऱ्या एकाने लिहिले की, “काय गुरू काय विषय आहे.”

चाहते प्रश्न विचारत असले, तरीही या दोघांनीही फोटोमध्ये मुलाबाबत कोणताही खुलासा केला नाहीये. रितेश आणि आम्रपालीच्या आगामी सिनेमाबाबत बोलायचं झालं, तर ते दोघेही ‘दाग एगो लांछन’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. असे म्हटले जात आहे की, हे लहान बाळही सिनेमाचा एक भाग असू शकते.

विशेष म्हणजे, अभिनेत्री आम्रपाली ही ३५ वर्षांची असून तिचे अद्याप लग्न झालेले नाही. तसेच, रितेश पांडे याने २०२१मध्ये वैशाली पांडेसोबत लग्न केले आहे. त्याला एक अपत्य आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘मी विजयला अर्धनग्न पाहिलंय, आता मला पूर्ण…’, ‘या’ अभिनेत्रीचा थेट करण जोहरसमोरच मोठा खुलासा
अरेरे कसलं ते दुर्देव! ‘या’ सुपरहिट सिनेमांना लाथाडत संजू बाबाने केली मोठी चूक? ‘बाहुबली’चाही समावेश
भांडं फुटलं रे! विजय आणि रश्मिकाच्या नात्याबाबत अनन्याचा मोठा खुलासा, म्हणाली…

हे देखील वाचा