Friday, March 29, 2024

सैफ अली खान नव्हे, तर ‘या’ अभिनेत्यासाठी अमृता सिंग झाली होती वेडी; मात्र नंतर ‘असा’ आला दुरावा

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळेच नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे अमृता सिंग (Amrita Singh). आपल्या अभिनयाइतकीच ती वैवाहिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती.

अमृता सिंग ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. आपल्या कसदार अभिनयाने तिने त्या काळात चित्रपट क्षेत्रात चांगलेच नाव कमावले होते. सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) तिच्या लग्नाच्या आणि घटस्फोटाच्या बातम्या आजही समोर येत असतात. मात्र सैफ अली खानच्या आधी अमृता आणि सनी देओलच्या (Sunny Deol) प्रेम प्रकरणाची चर्चा जोरदार रंगली होती. इतकेच नव्हे. तर ते दोघे लग्नही करणार असल्याच्या बातम्या त्या काळात रंगल्या होत्या.

अमृता सिंग आणि सनी देओल यांनी ‘बेताब’ चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटातील दोघांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाने दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमृता आणि सनी देओलमध्ये जवळीक वाढली होती. यावेळी अमृता सिंगने सनी देओलसोबत लग्न करण्याचीही तयारी केली होती. मात्र तिला सनी देओलच्या लग्नासंबंधित कसलीही कल्पना नव्हती. त्यावेळी सनी देओलने आपल्या करियरवर परिणाम होऊ नये म्हणून ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती की, तो विवाहीत आहे. मात्र ज्यावेळी अमृता सिंगच्या कानावर हे सत्य आले तेव्हा तिला जोरदार धक्का बसला होता. तिच्या आईनेही तिला बंधने घालायला सुरुवात केली.

हळूहळू दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर सनी देओल आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadiya) यांच्या प्रेमप्रकरणाची ही सर्वत्र चर्चा सुरू होती. सनी देओल डिंपल कपाडिया सोबतही दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होता. यावेळी दोघांच्या संबंधांबद्दल अमृता सिंगने धक्कादायक विधान केले होते. ती म्हणाली की, “मला वाटतं तिला तिचा केक मिळाला आहे, आणि ती त्याला खात आहे, तिच्याकडे गमवायला काहीच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे तिला तिचा मुलगा मिळालाय ज्याचा ती विचार करत असते.”

दरम्यान, अमृता सिंग आणि सैफ अली खानने 1991 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले असून दोघेही सध्या यशाच्या शिखरावर आहेत. सारा अली खान चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर इब्राहिम खान ही आपल्या दमदार लूकमुळे नेहमी चर्चेत असतो. मात्र सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा विवाह कायमचा टिकू शकला नाही, त्यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. ज्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत लग्न केले.(actress amrita singh and sunny deol relationship breakup due to this reason)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्दर्शक भाऊरावच्या नजरेने कैद केले दोन नवे चेहरे, ‘टीडीएम’मध्ये दिसणार त्यांच्या अभिनयाची कमाल

प्रेयसीने आपल्याशी लग्न करावे म्हणून जगजीत सिंग यांनी तिच्या नवऱ्यालाच करायला लावली होती मध्यस्थी

हे देखील वाचा