नोरा फतेहीने केले अतिशय हटके अन् विचित्र फोटोशूट; नेटकऱ्यांनी केली थेट रणवीर सिंगशी तुलना


‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोराने खूपच कमी कालावधीमध्ये तिचे या ग्लॅमर इंडस्ट्रीमधले स्थान पक्के केले आहे. ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरवन’ या सिनेमातून नोराने करिअरला सुरुवात केली. पण या सिनेमाचा नोराच्या करिअरला काही विशेष फायदा झाला नाही. मात्र, ‘बाटला हाऊस’ चित्रपटामध्ये तिने केलेला ‘दिलबर’ गाण्यावरील डान्स तुफान गाजला. या गाण्याने तिच्या करिअरला एक मोठे आणि सुखद वळण दिले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

नोरा तिच्या जबरदस्त डान्ससोबत तिच्या फॅशन सेन्ससाठी आणि तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. डान्सिंग दिवा असणारी नोरा अनेकांच्या हृदयावर राज्य करते. तिला सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग देखील आहे. नोरा सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेहमीच ती तिचे विविध फोटो पोस्ट करत असते. यावेळी देखील नोराने तिचे अतिशय हटके, विचित्र कपडे घातलेले आणि आगळे वेगळे फोटो शेअर केले आहेत. सध्या जीन्स टॉपमध्ये देखील मादक दिसणाऱ्या नोराचे अशा अवतारातील फोटो पाहून फॅन्सने तिच्या फॅशन सेन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिच्या फॅशनची तुलना रणवीर सिंगच्या फॅशनसोबत केली आहे.

नोराच्या पहिल्या लूकबद्दल सांगायचे झाले, तर तिने काळ्या रंगाचे स्किन फिट स्वेटर घातले असून हे स्वेटर हाय नेकलाइन आणि फुल स्लीव्स असून त्यावर नियॉन ग्रीन रंगाची फ्लोरल प्रिंट आहे. याव्यतिरिक्त बॉटममध्ये तिने कलर-ब्लॉक्ड पॅटर्न वरून प्रेरित झालेली एक पँट घातली आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये नोराने लाल रंगाचा ताईट फिटिंग असलेला टॉप घेतला असून, त्यावर ग्रीन जॉगर्स पँट आणि लाल मोजे घातले आहेत.

नोराचे हे फोटो एका थीम फोटोशूटचे असून ते एका आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरने काढले आहेत. नोराच्या या फोटोंमुळे अनेक पॅटर्न, रंग आणि डिझाईन दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचा आत्मविश्वास आणि तिची लवचिकता आपण पाहू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.