×

अंकिता लोखंडेचा पती विकी जैनचा अभिनयात श्री गणेशा, ‘या’ शोमध्ये दिसणार ही जोडी

टेलिव्हिजनवर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखवून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे होय. अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत ज्यांनी अंकिताला पडद्यावर पाहिले आहे, त्यांना आता तिचा नवरा विकीही पडद्यावर पाहायला मिळणार आहे. होय, विकी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. या शोचा प्रोमो शेअर करून अंकिताने कॅमेराच्या दुनियेत विकीचे स्वागत केले आहे. ‘स्मार्ट जोडी’ असे या शोचे नाव आहे.

शनिवारी शोचा होणार आहे प्रिमियर

अंकिताने (Ankita Lokhande) प्रोमोसोबत लिहिले की, “मला माहित नव्हते की, तू अभिनयही करू शकतोस, लाईट, कॅमेरा आणि ऍक्शनच्या जगात तुझे स्वागत आहे बाळा. मला खात्री आहे की, आम्ही एकमेकांसोबत या प्रवासाचा आनंद घेऊ आणि आपल्यासोबत कायमस्वरूपी राहतील अशा सुंदर आठवणी टिपू.” यासोबतच अंकिताने शोचे चॅनेल आणि वेळेबाबतही माहिती दिली आहे. ‘स्मार्ट जोडी’ नावाचा हा शो स्टार प्लसवर शनिवारी रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार आहे.

Photo Courtesy: Instagram/lokhandeankita

प्रोमोमध्ये अंकिता आणि विकी (Vicky Jain) आपापल्या आवडी-निवडीबद्दल सांगत आहेत. मिर्ची आईस्क्रीमपासून ते आवडते डेस्टिनेशन आणि रोमँटिक चित्रपटांपर्यंत या दोघांनाही या गोष्टी आवडतात. होय, अशा काही गोष्टी आहेत ज्यात थोडीशी तडजोड करावी लागेल. या आवडी-निवडी काय आहेत आणि हे स्मार्ट कपल का आहेत, हे समजण्यासाठी शोची वाट पाहावी लागेल.

Photo Courtesy: Instagram/lokhandeankita

विकी जैन आहे व्यावसायिक 

अभिनेत्री असलेल्या अंकितासाठी हा शो कठीण नसला तरी व्यावसायिक विकीसाठी हा त्याचा पहिला शो असेल. व्यावसायाच्या दुनियेत त्याने यशाची चव चाखली असेलच, पण पडद्यावर तो स्वत:ला कसा सांभाळेल हे पाहणे मजेशीर ठरेल. अंकिता आणि विकीने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न केले. त्यांच्या हळदी, मेहंदीपासून ते लग्नापर्यंत सर्व काही अतिशय भव्यदिव्य होते. या ग्रँड वेडिंगमध्ये दोघांच्या रॉयल लूकची खूप चर्चा झाली होती.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post