अंकिता लोखंडेने पती विकीसोबत ‘अशी’ केली होती संगीताची रिहर्सल, व्हिडिओ शेअर करत म्हणाली..

‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने १४ डिसेंबर रोजी तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते आणि आता त्यांनी सात जन्मासाठी एकमेकांचा हात धरला आहे. लग्नाआधीच्या आणि नंतरच्याही अंकिता तिच्या लग्नाच्या फंक्शन्सची झलक चाहत्यांसोबत शेअर करत आहे आणि आता पुन्हा एकदा ती असेच काही करताना दिसत आहे. दोघेही त्यांच्या लग्नासाठी प्रचंड उत्सुक होते. त्यामुळे त्यांनी लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी अतिशय सुंदर तयारी केली होती. ज्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंकिताने (Ankita Lokhande) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने आणि तिच्या कुटुंबाने संगीतासाठी डान्सचा सराव कसा केला हे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री आणि तिचे कुटुंब उत्सुक होऊन डान्ससाठी सराव करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ अंकिताच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

व्हिडिओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, तिच्या संगीतासाठी सराव करतानाचा हा डान्स व्हिडिओ आहे. अंकिता कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही आमच्या संगीतासाठी अशी रिहर्सल केली. फार सिरियस नाही, पण आम्ही ते करून दाखवले. हॅप्पी डान्सिंग फीट, आमच्यासोबत इतकी सहनशक्ती धरल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की, आम्ही चांगले काम केले.”

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

व्हिडिओवर कमेंट करत युजर्स तिच्या डान्स कौशल्याचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा आजीच्या डान्सची झाली. जी कुटुंबासह पूर्ण उत्साहात डान्सच्या सरावात गुंतली होती. अंकिताचे संपूर्ण कुटुंब एकत्र जमताना पाहून तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या शाही लग्नात मृणाल ठाकूर, माही विज, आरती सिंग, आशा नेगी यांसारखे सेलिब्रिटी दिसले. या सेलिब्रिटींशिवाय सना मकबूल आणि अमृता खानविलकर यांनीही खास रिसेप्शनला हजेरी लावली होती. अभिनेता राज सिंग अरोरा आणि करणवीर बोहरा यांनीही त्यांची मैत्रीण अंकिताच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती.

हेही वाचा :

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू जिममध्ये गाळतेय घाम, वर्कआऊट व्हिडिओ होतोय व्हायरल

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर अशाप्रकारे केले जाते कोरोना नियमांचे पालन, पाहा फोटो

कार्पोरेट लूक आणि ग्लॅमरस पूजा सावंत, फोटो पाहून चाहत्यांचे हरपले भान

 

 

Latest Post