अर्रर्र! अंकिता लोखंडेसोबत घडली वाईट घटना, नाही होणार अभिनेत्रीचे लग्न?


अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पुढील आठवड्यात तिचा बॉयफ्रेंड विकी जैन (Vicky Jain) याच्यासोबत लग्न करणार आहे. लग्नाआधी अंकिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बातमी कळताच अंकिताच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘पवित्र रिश्ता’ अभिनेत्रीला मंगळवारी (०७ डिसेंबर) रात्री मुंबईतील सबअर्बन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

माध्यमांतील वृत्तानुसार, अंकिताच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी अंकिताला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे, अंकिताला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ती तिच्या घरी आराम करत आहे.

अंकिताच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. ती लवकरच विकी जैनसोबत सात फेरे घेणार आहे. अंकिताने नुकतीच मित्रांना बॅचलर पार्टी दिली, ज्यामध्ये सृष्टी रोडे, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, रश्मी देसाई यांच्यासह अंकिताच्या अनेक मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. अंकिताने गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर प्री-वेडिंग फंक्शन केले.

अंकिता आणि विकी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. विकी आणि अंकिताची प्रेमकहाणी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. अशा परिस्थितीत अंकिताच्या दुखापतीमुळे तिचे लग्न टांगणीला लागू नये, ही चिंता चाहत्यांना सतावत आहे.

अलीकडेच अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून विवाहाच्या आधीच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळला होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ इंटरनेटवर पसरला होता. व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, या जोडप्याने पत्रिका तयार करण्यासाठी खूप खर्च केला होता.

त्याचबरोबर विवाहपूर्व सोहळ्यात अंकिता आणि विकी पारंपारिक पोशाखात दिसले होते, ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये अंकिता हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत होती. विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. फोटोत हे जोडपे मुंडावळ्या बांधलेले दिसले होते, जे लग्नाच्या दिवशी बांधण्याची प्रथा आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!