धक्कादायक! अल्पवयीन मोलकरणीला सँडलने मारहाण, २५ वर्षीय अभिनेत्रीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


एका २५ वर्षीय अभिनेत्रीला पोलिसांनी घरातील अल्पवयीन मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. सदर पीडितेने अभिनेत्रीवर विवस्त्र करून त्रास दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीने घरातील मोलकरणीला मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अभिनेत्री वर्सोवा येथील रहिवासी असून, ती एका फ्लॅटमध्ये एकटीच राहते. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.

विवस्त्र फोटो काढण्याचा केला प्रयत्न
माध्यमांतील वृत्तानुसार, आरोपी अभिनेत्रीने तिच्या घरातील अल्पवयीन मोलकरणीला अनेकदा मारहाण केली आहे. याचे कारण केवळ ती व्यवस्थित काम करत नसल्याचे सांगितले जात आहे. अल्पवयीन पीडितेने यापूर्वी तक्रार दिली नव्हती, मात्र नुकतेच या अभिनेत्रीने पुन्हा असे वर्तन केल्याने तिच्या घरच्यांनी पोलिसांची मदत घेतली. अभिनेत्रीने विवस्त्र तिचे व्हिडिओ आणि फोटो काढण्याचाही प्रयत्न केल्याचा दावा पीडितेने केला आहे. (actress arrested by mumbai police for torturing minor house help)

अल्पवयीन मुलीच्या डोक्याला झाली दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने मोलकरणीवर सँडल फेकून हल्ला केला आणि त्यानंतर तिच्या डोक्यालाही दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर, पीडितेच्या नातेवाइकांनी तिला जखमी अवस्थेत पाहिले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. सदर प्रकरणाची माहिती देऊन तिच्या घरच्यांनी अभिनेत्रीवर तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या अभिनेत्रीवर कलम ३२६ (हल्ला), २५४ (ब) (महिलेवर प्राणघातक हल्ला करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि कलम ५०४ (हेतूपूर्वक अपमान) लैंगिक अपराध कायदा (पोक्सो) अंतर्गत एफआयआर नोंदवली आहे.

अभिनेत्रीला सोमवारपर्यंत ठेवण्यात येणार कोठडीत
असा दावा देखील करण्यात आला आहे की, अभिनेत्रीला माहित होते की, तिच्या घरातील मोलकरीण अल्पवयीन आहे. तरी देखील तिने तिला घरी काम करण्यासाठी ठेवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अभिनेत्रीला अटक केली असून, सध्या अभिनेत्रीला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा –


Latest Post

error: Content is protected !!