Monday, July 1, 2024

आतापर्यंत बेबी बंप फोटो शेअर केलेल्या सर्व अभिनेत्रींना बिपाशाने टाकले मागे, पाहा बाेल्ड फाेटाे

बाॅलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू हिच्यासाठी सध्याचा काळ खूप महत्चाचा आहे, कारण 43 वर्षीय अभिनेत्री लग्नाच्या 6 वर्षानंतर आई होणार आहे. बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर खूप आनंदी आहेत. बिपाशा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रेग्नसीचे सुंदर फाेटाे सतत शेअर करत असते. मात्र, बिपाशा ही एकमेव अभिनेत्री नाही जी तिचा बेबी बंप दाखवताना दिसते. याआधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींही बेबी बंप फाेटाे शूट केले आहे. मात्र, बिपाशाने तिचे लेटेस्ट बेबी बंप फोटोशूट करून सर्वांनाच मागे टाकले आहे. 

अभिनेत्री बिपाशा बसू (bipasa basu) तिच्या प्रेग्नसीच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. बिपाशाने एका ड्रेसमध्ये तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, पण हा लेटेस्ट बेबी बंप शूट खूपच बोल्ड आहे. सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये बिपाशाचा बेबी बंप तर दिसत आहे पण त्याचबराेबर तिचे सेक्सी पायही दिसत आहेत. तिच्या एका पायावर काळा धागा बांधला आहे. अभिनेत्रीने हे फाेटाे शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “स्वतःवर सदैव प्रेम करा, त्या शरीरावर प्रेम करा ज्यामध्ये तुम्ही राहता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बसूचा हा फोटो पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत बेबी बासू ग्रोव्हरला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एक चाहता तिच्या या फाेटाेवर कमेंट करत म्हणाला,’गॉर्जियस मम्मा.’ मात्र, बिपाशाची ही स्टाईल अनेक सोशल मीडिया युजर्सच्या पसंतीस उतरली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

याआधीही जेव्हा बिपाशा बसूने बेबी शॉवर सेरेमनी केली होती, तेव्हाही त्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्याआधी, बिपाशा काळ्या रंगाच्या ट्रांसपॅरेंट आउटफिटमध्ये तिचा बेबी बंप दाखवताना दिसली होती.

बिपाशा बसूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. ‘अजनबी’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या बिपाशाला ‘राज’ चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता मिलिंद गुरव झळकणार रूपेरी पडद्यावर

शर्लिन चोप्राचे कडवट शब्द ऐकून पुन्हा भडकली राखी सावंत; म्हणाली, ‘तुझ्याकडे वरपासून खालपर्यंत…’

हे देखील वाचा