दीपिका पदुकोणने शेअर केला ‘असा’ सेल्फी; युजर्स म्हणाले, ‘शॅम्पू आणि तेल तरी घे बाई…’

नवीन आणि वेगळ्या हेअरस्टाइल, मेकअप लूक आणि सेलिब्रिटींचे फॅशन स्टेटमेंट वापरून पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. परंतु कधीकधी बी-टाऊन कलाकारांची ओव्हर-द-टॉप फॅशन चाहत्यांना प्रभावित करण्याऐवजी गोंधळात टाकते आणि अशा परिस्थितीत, युजर्सला त्यांच्या आवडत्या कलाकाराला ट्रोल करण्याची संधी मिळते. आता असेच काहीसे बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) घडले आहे.

दीपिकाने विखुरलेल्या केसांमध्ये तिचा फोटो पोस्ट केल्यानंतर युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण यावेळी युजर्सच्या कमेंट्स वाचून तुम्हाला राग येणार नाही, तर हसायलाही येईल.

दीपिका पदुकोण का झाली ट्रोल?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हेअर फ्लिप ट्रेंडनंतर दीपिकाने विखुरलेल्या केसांमधील स्वतःचा एक सेल्फी शेअर केला आहे. अभिनेत्रीने फोटोच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, तिने केस विंचरण्याचा प्रयत्न केला. पण दीपिकाचा हा प्रयत्न फसला आणि विखुरलेल्या केसांमधील दीपिकाचा फोटो पाहून युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

युजर्स दीपिकाच्या केसांची उडवत आहेत खिल्ली
दीपिकाचा फोटो पाहून अनेक युजर्स तिच्या केसांची खिल्ली उडवत आहेत. काही तिला केस कापण्याचा सल्ला देत आहेत, तर काही अंघोळ करण्याचा सल्ला देत आहेत. एका युजरने लिहिले की, “अंघोळ करा, जास्त थंडी नाही.” दीपिकाला ट्रोल करताना आणखी एका युजरने लिहिले की, “असे दिसते की कंगवा उपलब्ध नाही.” दुसऱ्या एका युजरने दीपिकाच्या केसांची खिल्ली उडवली आणि लिहिले की, “मला वाटते तिला केस कापण्याची गरज आहे.” आणखी एका युजरने लिहिले की, “इतके पैसे कुठे ठेवणार? तुम्ही शॅम्पू आणि तेल घेऊ शकता.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दीपिका पदुकोण कबीर खानच्या ‘८३’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील दीपिकाच्या लूकचे खूप कौतुक झाले होते. दीपिका आता ‘गहराइया’, ‘फायटर’ आणि ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post