Sunday, February 16, 2025
Home बॉलीवूड चार मिनीटांचा किसींग सीने देत विक्रम करणाऱ्या अभिनेत्रीला भोगाव्या लागल्या होत्या अतोनात यातना

चार मिनीटांचा किसींग सीने देत विक्रम करणाऱ्या अभिनेत्रीला भोगाव्या लागल्या होत्या अतोनात यातना

बॉलिवूडमध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत. ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप नाव कमावले आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळवले. त्या प्रचंड लोकप्रियही आहेत, परंतु यातील अभिनेत्रींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक शारीरिक अत्याचाराला सामोरे जायला लागले. 60 च्या दशकात महिला या जास्त खुलेपणाने बोलू शकत नव्हत्या. त्यांना त्यांचे मत त्यांना मांडता येत नव्हते. त्यांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. या गोष्टी यावेळी केवळ सामान्य महिलांसोबत घडता नव्हत्या, तर अनेक अभिनेत्री देखील या हिंसाचाराला सामोऱ्या गेल्या आहेत. अश्याच या हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या देविका राणी या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत.

देविका यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. त्यांच्या चित्रपटात एका किसिंग सीनने तर सगळ्यांना हैराण केले होते. त्यामुळे त्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. पण त्यांना वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेकवेळा अत्याचाराला सामोरे जावे लागले होते.

देविका राणी या भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या अशा महिला होत्या,  ज्यांनी सर्वात आधी फिल्म स्टुडिओ बॉम्बे टॉकीजची को-फाउंडर बनून महिलांसाठी एक नवा ट्रेंड सेट केला होता. देविका राणी या त्याकाळातील अत्यंत स्वतंत्र विचार असलेल्या महिला होत्या. करिअरला सुरुवात झाल्यानंतर कमी कालावधतीचं त्यांनी खूप यश मिळवले होते.

देविका यांची 1928 मध्ये पहिल्यांदा हिमांशू रॉय यांच्याशी एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. देविका त्या चित्रपटाच्या कॉश्श्युम डिझायनर होत्या. सोबत काम करत करत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 1929 मध्ये त्या दोघांनी लग्न केले आणि त्यानंतर ते बर्लिनला रवाना झाले. त्यानंतर 1933 मध्ये देविका यांनी ‘कर्मा’या चित्रपटातून त्यांच्या करीअरला सुरुवात केली.

देविका यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. देविका यांनी त्यांचा पती हिमांशू सोबत या चित्रपटात 4 मिनिटाचा एक किसींग सिन दिला होता. या सीनने रेकॉर्ड केले होते, जे रेकॉर्ड आज पर्यंत कोणीही तोडू शकले नाही. हा चित्रपट इंग्लंडमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतामध्ये हा चित्रपट ‘नागीण की रागिणी’ या नावाने पुन्हा प्रदर्शित केला गेला. परंतु हा चित्रपट भारतात जास्त चालला नाही आणि फ्लॉप झाला. परंतु तरीही देविका यांनी हार नाही मानली. त्यांनी याच वर्षी 18 एकर मध्ये बॉम्बे टॉकीजची स्थापना केली.

किश्र्वर देसाई यांनी लिहिलेल्या ‘द लॉंगेस्ट किस’ या पुस्तकात देविका यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नानंतर त्यांना सहन कराव्या लागलेल्या शारीरिक अत्याचार बद्दल सांगताना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, “माझी प्रिय, ती खूप घाबरलेली आहे. तीला मारलं होत. ती खूप तडफडली होती. तिच्याकडून खूप काम करून घेतले होते. तिचा मानसिक छळ केला होता. पण देवाने तिला आतून तुटून नाही दिले.”

1945 मध्ये देविका राणी यांनी रोएरीच यांच्याशी दुसरे लग्न केले होते. लग्नानंतर देविका आणि त्यांचा पती मनालीला  स्थायिक झाले आणि तिथे त्यांनी एक्सपोर्ट कंपनी सुरू केली. 9 मार्च 1994 मध्ये भारतीय पहिल्या अभिनेत्रीने या दुनियेचा निरोप घेतला.

हे देखील वाचा