टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेने ‘अक्षरा’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री हिना खान हिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आज हिनाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. हिना तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. हिनाने नुकतेच तिच्या दिवंगत वडिलांचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये ती तिच्या वडिलांना सुपरहिरो सांगताना दिसली. अभिनेत्रीने अनोख्या अंदाजात वडिलांचा वाढदिवस साजरा केला. ती त्यांच्या आवडीचे फूल आणि केक घेऊन कबरीवर पोहोचली होती.
हिना खान (Hina Khan) हिने गेल्या वर्षी २० एप्रिल, २०२१ रोजी तिच्या वडिलांना गमावले होते. हृदयविकाराच्या झटक्याने तिच्या वडिलांचे निधन झाले होते. हिनाचे तिच्या वडिलांसोबत खास बाँडिंग राहिले आहे. अभिनेत्रीच्या वडिलांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या क्षणी ती खूपच भावूक झाली.
‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हिनाने तिच्या वडिलांची आवडती फुले त्यांच्या कबरीवर पाठवली. तिने त्यांचा आवडता अननस केक आणि पुष्पगुच्छही आणला, जो त्यांच्या फोटोसमोर ठेवला होता. हिनाने फोटोंना कॅप्शन देत लिहिले की, “आमच्या सुपरहिरोंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”
तिच्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, तिने इंस्टाग्राम स्टोरीवर हिनाने तिच्या वडिलांसोबत लपाछपी खेळतानाचा एक छोटा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने लिहिले होते की, “२० एप्रिल, २०२१… या दिवसाने आमचे आयुष्य कायमचे बदलले, बाबा.” दुसर्या पोस्टमध्ये, तिने तिच्या आईचा एक फोटो शेअर केला आणि एक भावनिक नोट लिहिली. त्यात तिने लिहिले होते, “आई… आपले सर्वस्व असलेल्या एखाद्याला गमावण्यापेक्षा काहीही वाईट असू शकत नाही… सर्वोत्तम जीवनसाथी, सर्वोत्तम पती, सर्वोत्तम मित्र आणि बरेच काही… ती तुमची खूप आठवण काढते बाबा.”
हिना ही तिच्या कुटुंबात सर्वाधिक तिच्या वडिलांच्या जवळ होती. अशामध्ये अभिनेत्रीला तिच्या वडिलांचे गमावण्याचे दु:ख सांभाळणे खूपच कठीण होते. वडिलांच्या निधनानंतर तिने त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘अरे यार, जेव्हापासून मी इंडस्ट्रीत आले…’, विजयसोबतच्या रिलेशनशिपबद्दल रश्मिकाने सांगूनच टाकलं
चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…
‘कबीर सिंग’च्या थप्पड सीनवर कियारा अडवाणीचे वक्तव्य; म्हणाली, ‘तुम्ही जेव्हा प्रेमात असता तेव्हा…’