उंचच उंच बिल्डींगवरून धोकादायक स्टंट करताना दिसली उर्वशी रौतेला, व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल!


बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. उर्वशीची खास गोष्ट म्हणजे, ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याविषयी माहिती देत ​​असते, त्यामुळे चाहते नेहमीच तिच्याशी जोडलेले असतात. अशातच अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर ४५ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण झाले आहेत. ज्याचा आनंद तिने सोशल मीडियावर व्यक्त करत, एक धोकादायक स्टंट केला आहे. या स्टंटचा एक व्हिडिओही तिने तिच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे.

केला धोकादायक स्टंट
उर्वशी रौतेलाने ४५ मिलियन फॉलोव्हर्स पूर्ण झाल्यानंतर, एक धोकादायक स्टंट करत सेलिब्रेट केले आहे. व्हिडिओमध्ये ती जगाच्या शिखरावरून स्लाईड करताना दिसत आहे. ही ग्लास बॉटम स्लाईड आहे, जी दुबईमध्ये आहे. संपूर्ण दुबईचे दृश्य या स्लाईडद्वारे पाहता येते. या व्हिडिओमध्ये उर्वशी खूपच आनंदी दिसत आहे. काचेच्या फ्रेममध्ये स्लाईड करताना ती थोडीही घाबरलेली वाटत नाहीये. (urvashi rautela perform dangerous stunt as completed 45 million instagram follower)

हा व्हिडिओ शेअर करत उर्वशीने लिहिलंय की, “ओएमजी ४५ मिलियन. जगाच्या शिखरावरून स्लाईड करत आहे. आय लव्ह यू. एका ग्लास बॉटम स्लाइडमध्ये सेलिब्रेट करत आहे.” उर्वशीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ ७ लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशी लवकरच रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या क्षणी तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. शिवाय ती लवकरच तेलुगू चित्रपटांमध्येही दिसणार आहे. ‘द लिजेंड’मधून ती तेलुगु इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट आहे. यासोबतच ती ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!