Thursday, July 18, 2024

अरे देवा! दिवाळीच्या दिवशीही जया बच्चन संतापल्या, घराबाहेर असलेल्या पॅपराझींना फटकारत पळवले

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचे पॅपराझींसोबत कधीही चांगले संबंध राहिले नाहीत. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना पाहायला मिळाल्यात ज्यात त्या फोटोग्राफर्सवर रागावताना दिसल्यात. काही दिवसांपुर्वी जया बच्चन यांचा एक व्हिडिओ समोर आला हाेता, ज्यामध्ये त्या फोटोग्राफर्सवर प्रचंड रागावताना दिसत हाेत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची नात नव्या नवेली नंदा ही देखील उपस्थित होती, जिने संपूर्ण प्रकरण हाताळले. आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्या फोटोग्राफर्सवर रागावताना दिसत आहे. जया बच्चन यांचा हा व्हिडिओ दिवाळीच्या दिवसातील आहे.

व्हिडिओमध्ये जया बच्चन (jaya bachchan) या कॅमेरामॅनवर ओरडतानाच नाही, तर त्याला पळवून लावताना दिसत आहे. जया बच्चनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिवाळी पुजेनिमित्त पॅपराझी बच्चन कुटुंबाचे फोटो काढण्यासाठी आले होते, परंतु अभिनेत्रीला हे आवडले नाही आणि तिने फोटोग्राफर्सला फटकारण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

जया बच्चन या पॅपराझींना पाहताच त्यांच्यावर भडकल्या आणि विचारले, “तुम्ही कसे फ्लॅश करत आहात?” यानंतर त्यांनी फोटोग्राफर्सला ‘घुसखोर’ म्हटले. अभिनेत्रीचा राग पाहून घटनास्थळी उपस्थित कॅमेरामननी लगेचच आपले कॅमेरे बंद केले आणि नंतर ते घटनास्थळावरून निघून गेले.

जया बच्चनच्या या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त करत पॅपराझींना अभिनेत्रीला एकटे सोडण्याचे आवाहन केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले, “तुम्ही लोक त्यांचे फोटो का काढत आहात? त्यांना एकटे सोडा. तुम्ही लोक या बाईवर तुमचा वेळ वाया घालवू नका.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले, “देवा, ती त्याच्याशी नीट बोलू शकत नाही का? ते त्यांच्या एका फाेटाेसाठी दिवसभर वाट पाहत असतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टने नीतू कपूरसोबत थाटामाटात साजरी केली पहिली दिवाळी; चाहते म्हणाले,’परफेक्ट फॅमिली …’

राहुलच्या त्रासामुळे डिप्रेशनच्या आहारी गेली होती वैशाली ठक्कर, फोटो व्हायरल होण्याचे मोठे कारण

हे देखील वाचा