Thursday, February 22, 2024

माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या कुणाल नायरवर जया बच्चन संतापल्या; म्हणाल्या, ‘त्याला मानसिक…’

ओटीट प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचा एक शो अचानक वादात सापडला आहे. बॉलीवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची यात अत्यंत घाणेरड्या शब्दात तुलना करण्यात आली आहे. तुलनाही अशा असभ्य भाषेत करण्यात आली आहे की, राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी याबाबत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अशात आता या प्रकरणावर अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन भडकल्या आहेत. त्यांनी ‘द बिग बँग थिअरी’ अभिनेता कुणाल नायरला दोन अभिनेत्रींसाठी वापरलेल्या भाषेबद्दल फटकारले आहे. केवळ जया बच्चनच नाही तर उर्मिला मातोंडकर आणि दिया मिर्झा या बॉलिवूड अभिनेत्रींनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

नेटफ्लिक्सच्या ‘द बिग बँग थिअरी’ (the big bang theory) शोमध्ये माधुरी दीक्षित(madhuri dixit)हिला ‘लेपरस प्रोस्टिट्युट’ म्हटल्यानंतर खळबळ उडाली आहे. ‘द बिग बँग थिअरी’च्या दुसऱ्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये एक सीन आहे, जिथे शेल्डनने ऐश्वर्या राय बच्चनची तुलना माधुरी दीक्षितशी केली आहे. तो म्हणतो, ‘ही ऐश्वर्या राय बच्चन आहे. मला वाटते ती गरिबांची माधुरी दीक्षित आहे.’ हे ऐकून राज (कुणाल नय्यर) चिडतो आणि म्हणतो, ‘तुझी हिंमत कशी झाली हे बोलण्याची. ऐश्वर्या ही ‘देवी’ आहे. त्या तुलनेत माधुरी ही ‘लेपरस प्रॉस्टिट्यूट’ आहे.

माध्यमांशी संवाद साधताना जया बच्चन (jaya bachchan) अतिशय रागाने म्हणाल्या, ‘हा कुणाल नायर पागल आहे का? फारच घाणरेडा बाेलताे ताे. त्याला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं पाहिजे.. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या काॅमेंटविषयी काय वाटते ते विचारायला पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by The Big Bang Theory (@bigbangtheory)

कुणाल नायरच्या या कमेंटमुळे केवळ जया बच्चनच नाही, तर उर्मिला मातोंडकर आणि दिया मिर्झा या अभिनेत्रीही प्रचंड संतापल्या आहेत. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, ‘मला एपिसोडची माहिती नाही, त्यामुळे मी कमेंट करू शकत नये, पण जर ते खरे असेल, तर ते अत्यंत अपमानास्पद आहे. हे लहान मानसिकता दर्शवते. अशाप्रकरची काॅमेडी हास्यस्पद दर्शवत नाही’, तर दिया मिर्झा म्हणाली की, हे ‘अपमानास्पद’ आहे.(actress jaya bachchan reacting to kunal nayyar derogatory dialogue on bollywood actress madhuri dixit and actress aishwarya rai in the big bang theory )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पंधराच दिवसात आईवडील गमवणाऱ्या लेखिकेबद्दल आणि सेटवर काम करणाऱ्यांबद्दल मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘जैतर’ मधून समोर येणार सत्यघटनेवर आधारित रोमांचक प्रेमकहाणी, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

हे देखील वाचा