Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड ‘तिला बघितले की…’, ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर फिदा झाला होता अक्षय खन्ना

‘तिला बघितले की…’, ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर फिदा झाला होता अक्षय खन्ना

आपल्या सौंदर्याने आणि घाऱ्या डोळ्यांनी सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन होय. ऐश्वर्या राय ही माजी मिस इंडिया विजेती आहे. मिस इंडियाचा मुकुट डोक्यावर घातल्यानंतर ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यांनतर तिच्या नितळ सौंदर्यामुळे ती चर्चेत आली. अगदी इंटरनॅशनल कलाकार देखील अनेक वेळा तिच्या सौंदर्याचे कौतुक करत असतात. बॉलिवूडमध्ये तर तिची एक झलक पुरेशी आहे. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त होती. बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील तिच्या सौंदर्यावर भाळले होते. या यादीत नाव येते ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना याचे. अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या यांनी ‘ताल’ आणि ‘आ अब लौट चले’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. ऐश्वर्या रायसोबत पहिल्यांदा काम करताना कसे वाटले या गोष्टीचा खुलासा अक्षयने एका शोमध्ये केला होता.

सन 2017 मध्ये ‘इत्तेफाक’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय खन्ना, सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे करण जोहरच्या चॅट शोमध्ये आले होते. त्यावेळी अक्षय खन्नाला विचारले होते की, बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री कोण आहे?? तेव्हा त्याने विचार न करता ऐश्वर्या राय हे नाव घेतले होते.

त्यावेळी त्याने सांगितले की,”ऐश्वर्या रायकडे बघितले की, नजरच हटत नाही. खरंतर मी असा व्यक्ती नाहीये की, कोणाकडे एकटक पाहत राहील, पण ऐश्वर्याच्या बाबतीत असे नाही होतं, तिच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं.” त्यावेळी सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, “केवळ पुरुषांना नाही तर मला देखील ऐश्वर्या राय खूप आवडते. तिच्यावरून नजर हटतच नाही.”

ऐश्वर्या रायने अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्याही विवाह केला आहे. त्या दोघांना आता एक आराध्या नावाची मुलगी देखील आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्या चित्रपटसृष्टी पासून दूर झाली. ती सध्या तिचा परिवार आणि तिच्या मुलीकडे जास्त लक्ष देत आहे. ऐश्वर्या खूप वर्षानंतर रत्नम यांनी दिग्दर्शन केलेल्या तमिळ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.(bollywood actor akshaye khanna said that he like aishwarya rai bachchan very much)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खरे की काय? गुपचूप लग्न केल्यानंतर ‘हा’ अभिनेता झाला बाबा? दोन महिन्याचे झाले बाळ

आकांक्षा दुबेच्या आत्महत्येनंतर बॉयफ्रेंडने सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट, म्हणाला

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा