Monday, September 25, 2023

ही दोस्ती तुटायची नाय! जुन्या मित्रासाठी नाना पाटेकरांची ‘Gadar 2’च्या स्क्रीनिंगला हजेरी, पाहा मित्रप्रेम

सध्या देशभरात सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा ‘गदर 2‘ सिनेमा भलताच चर्चेत आहे. शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) देशभरातील चित्रपटगृहात रिलीज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या सिनेमाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जबरदस्त राहिले होते. अशातच रिलीजच्या दिवशी ‘गदर 2’ची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यासाठी संपूर्ण देओल कुटुंबाने हजेरी लावली होती. तसेच, अनेक बॉलिवूड कलाकारही यावेळी हजर होते. यामध्ये मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांचाही समावेश होता. अशात सनी देओल आणि नाना पाटेकर यांचा यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

नाना पाटेकरांची स्क्रीनिंगला हजेरी
दिग्गज कलाकारांमध्ये गणल्या जाणारे नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. तसेच, ते खूप कमी सिनेमांच्या स्क्रीनिंगला हजेरी लावताना दिसतात. मात्र, आपल्या जुन्या मित्रासाठी नाना ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचले. यावेळीही ते साध्या पेहरावाताच पोहोचले होते. यादरम्यानचा नाना पाटेकर आणि सनी देओल (Nana Patekar And Sunny Deol) यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोघेही एकमेकांची गळाभेट घेतात. तसेच, सनी देओल नानांना पॅपराजींपुढे पोझ द्यायलाही सांगतो. हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सिनेमाची कमाई
पहिल्या दिवशी ‘गदर 2’ सिनेमाने जवळपास 40 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशात दुसरा दिवस वीकेंडचा असल्यामुळे कमाईत वाढ तर होणारच होती. या सिनेमाने शनिवारी 43 कोटी रुपये छापले. अशाप्रकारे दोनच दिवसात ‘तारा सिंग’ (Tara Singh) म्हणजेच सनी देओल (Sunny Deol) याच्या सिनेमाने 80 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच, हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्येही सामील होईल, अशी चर्चा आहे.

तब्बल 22 वर्षांनंतर सीक्वल
खरं तर, ‘गदर 2’ हा 2001 साली आलेल्या ‘गदर’ सिनेमाचा सीक्वल आहे. या सिनेमाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या सिनेमात सनी देओल याच्याव्यतिरिक्त अमीषा पटेल ‘सकीना’च्या, तर उत्कर्ष शर्मा ‘चरणजित सिंग’ या भूमिकेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Box Collection Day 2 : ‘Gadar 2’ने अवघ्या दोनच दिवसात हालवून टाकलं बॉक्स ऑफिस, ‘OMG 2’नेही घेतली भरारी
ब्रेकिंग! अंकिता लोखंडेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं

हे देखील वाचा