साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारी अभिनेत्री काजल अग्रवाल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. काजल तिच्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचबरोबर ती आपल्या चित्रपटासंबंधित माहिती चाहत्यांना देत असते. अलीकडेच काजल अग्रवालने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक नवीन फोटो शेअर केला आहे.
खरं तर, बुधवारी (११ ऑगस्ट) काजल लग्नानंतरची पहिली हरियाली तीज आहे. तिने तीज साजरी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये काजल हिरव्या रंगाlच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे. यासोबतच काजलने तिच्या गळ्यात एक सुंदर चोकर, स्टायलिश कानातले घातले आहेत. त्याचबरोबर तिच्या भांगेत गुलाब लावले आहे. तिच्या हातावर मेहंदी काढली आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress Kajal Aggarwal celebrates her first green tea after marriage)
विशेष म्हणजे फोटोत काजलची आई तिला तयार करताना दिसत आहे. याशिवाय इतर अनेक नातेवाईकही या फोटोमध्ये दिसत आहे. काजलने ३० ऑक्टोबर, २०२० रोजी लग्न केले आहे. काजल अनेकदा पती गौतम किचलूसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर चाहते ही तिच्या फोटोंना खूप पसंत करतात. गौतम आणि काजलच्या लग्नाचे आणि साखरपुड्याचे फोटो देखील व्हायरल झाले होते.
मात्र, लग्नानंतर आता काजलला पुन्हा चांगले चित्रपट करायचे आहेत आणि त्यासाठी ती सर्व प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीवरून, काजलचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले आहे. पण लग्नानंतर तिच्या चित्रपट कारकिर्दीवर खूप परिणाम झाला आहे. जेव्हापासून तिने बिझनेसमन गौतमशी लग्न केले, तेव्हापासून तिला चित्रपटांकडून चांगल्या ऑफर येत नाहीत. अशा परिस्थितीत तिने चांगले चित्रपट मिळण्यासाठी तिने मानधन निम्मे करण्याचा निर्णय घेतला आहे.
काजल आणि चिरंजीवी आगामी चित्रपट ‘आचार्य’ मध्ये महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहेत. याव्यतिरिक्त ती नागार्जुनसोबत ‘इंडियन २’ मध्ये ही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज
-अभिनेत्री हंसिका मोटवानीने मालदीवमधून बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग
–‘तू रंग है मेरा…’, म्हणत भाग्यश्री मोटेच्या लेटेस्ट फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


