Monday, June 24, 2024

मंदिरात शाॅर्ट्समध्ये मुलींना पाहून कंगनाला आला राग; म्हणाली, ‘जोकर कॅज्युअल कपड्यांमध्ये आळशी अन्…’

कंगना रणौत ही बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दमदार चित्रपट केले आहेत आणि आता ती तिच्या आगामी ‘इमर्जन्सी‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या व्यतिरिक्त कंगना सोशल मीडियावरही कायम सक्रिय असून विविध विषयांवर आपली मते मांडताना दिसते. अशात अलीकडेच, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शार्ट्स परिधान करून मंदिरात जाणाऱ्यांना फटकारले आहे. खरं तर, अलीकडेच मुली शार्ट्स घालून मंदिरात गेल्या हाेत्या, ज्यावर कंगनाने ट्विट करत आपला राग व्यक्त केला आहे.

कंगना रणौत (kanagana ranaut) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट रिट्विट करत सांगतिले की, ‘हे हिमाचलच्या प्रसिद्ध शिव मंदिर बैजनाथचे दृश्य आहे. एखाद्या पब किंवा नाईट क्लबमध्ये गेल्याप्रमाणे हे लोक बैजनाथ मंदिरात पोहोचले आहेत. अशा लोकांना मंदिरात प्रवेश देऊ नये. याला माझा तीव्र विरोध आहे. हे सगळं बघून, जर माझ्या विचारसरणीला लहान किंवा चुकीचे म्हटले तर तेही मला मान्य आहे.

कंगनाने पुढे लिहिले, ‘हे वेस्टर्न कपडे आहेत, जे गोर्‍या लोकांनी बनवले आणि प्रमोट केले आहेत. स्वतःचे उदाहरण देत कंगना म्हणाली, “मी एकदा व्हॅटिकनमध्ये शॉर्ट्स आणि टी-शर्ट परिधान करून होते आणि मला त्या आवारात जाण्याची परवानगीही नव्हती. कपडे बदलण्यासाठी मला हॉटेलवर परत जावे लागले.” कंगनाने पुढे लिहिले, “नाईट ड्रेस घातलेले हे जोकर कॅज्युअल कपड्यांमध्ये आळशी आणि मूर्ख दिसतात. मला वाटत नाही की, त्यांचा दुसरा काही हेतू असेल, या मूर्खांसाठी कठोर नियम असावेत.” मंदिराच्या आवारात लहान कपडे घालणाऱ्यांसाठी कंगनाने ‘सीधी बात नो बकवास’ फंडा अवलंबला आहे.

https://twitter.com/NikhileshUniyal/status/1661571552112943107?s=20

कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘तेजस’, ‘चंद्रमुखी 2’ आणि ‘सीता द अवतार’ या सिनेमांबाबतही प्रचंड चर्चेत आहे.(bollywood actress kanagana ranaut lashes out peoples who wear western clothes in the temple premises)

हे देखील वाचा