Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड मला आयुष्यात जासूस बनायचे होते; नवीन चित्रपटाविषयी बोलली करीना…

मला आयुष्यात जासूस बनायचे होते; नवीन चित्रपटाविषयी बोलली करीना…

करीना कपूरचा पुढचा चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा आहे. या चित्रपटाद्वारे ती निर्माती म्हणूनही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज मंगळवारी लाँच करण्यात आला. एका शानदार कार्यक्रमात हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. यावेळी करीना कपूरपासून ते हंसल मेहता आणि एकता कपूरपर्यंत चित्रपटाशी संबंधित अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी करीना कपूरने सांगितले की तिने हा चित्रपट का साईन केला…

या चित्रपटात काम करण्याबाबत करीना कपूर म्हणाली, ‘मला जासूस बनायचे होते, म्हणून मी या चित्रपटात काम केले’. याशिवाय करीना कपूर म्हणाली की, ‘कॅमेऱ्यासमोर येणे ही माझी आवड आहे आणि पुढेही राहील’. करीना कपूर ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये आली होती. तीच्यासोबत एकता कपूर आणि हंसल मेहताही स्टेजवर दिसले.

यावेळी करीनाने एकताचे आभार मानले आणि म्हणाली, तिने माझ्यावर विश्वास ठेवला. ती नेहमीच माझ्यासाठी पाठीचा कणा राहिली आहे. याशिवाय हंसल मेहताचे कौतुक करताना तिने सांगितले की, मला ही कथा खूप आवडली. मी अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले आहे, पण हे पात्र माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा करीनाला विचारण्यात आले की करीना कपूर निर्माता बनण्यावर काय म्हणेल? यावर करीना म्हणाली, ‘अनेकांना चांगले क्राईम थ्रिलर पाहायला आवडतात. तुम्ही तामिळ, तेलगू किंवा इंग्रजी बोलत असलात तरी भाषेचा फरक पडत नाही, बहुतेक लोकांना क्राईम थ्रिलर आवडतात. मला स्वत: डिटेक्टिव्ह शो पाहण्याची विशेष आवड आहे. माझा या चित्रपटाशी खूप जवळचा संबंध आहे, प्रेक्षकांना हा चित्रपट बघायला मजा येईल.

एकता कपूरने हा चित्रपट आणि त्यातील कलाकारांबद्दल चर्चा केली आणि करीना कपूरचे कौतुक केले. एकता म्हणाली की, या चित्रपटाची स्टार करीना खास आहे. तर हंसल मेहता म्हणाले, ‘या चित्रपटाविषयी एकता म्हणाली होती की, ही स्टोरी तुम्हाला करायची आहे. मी वेगळं काहीतरी करणार होतो पण एकताने या चित्रपटासाठी विचारलं. हा चित्रपट बनवणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता, खूप आव्हाने होती पण संपूर्ण प्रवास मजेशीर होता.

हंसल मेहता म्हणाले की, हा चित्रपट बनवताना सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बजेट बिघडले नाही. हा चित्रपट हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे, तर एकता कपूर आणि करीना कपूर संयुक्तपणे याची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात करिनासोबत ॲश टंडन, रणवीर ब्रार आणि किथ ॲलन आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

जस्टीस हेमा समितीवर बोलली निर्माती एकता कपूर; महिलांसाठी सुरक्षित वातावरण राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा