बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) विवाहबंधनात अडकले आहेत. आता ते एकमेकांसोबत सात जन्मासाठी बांधले गेले आहेत. सध्या सर्वत्र या नव्या जोडप्याच्या चर्चा रंगत आहेत. लग्न तर उरकले आता लग्नाच्या भेटवस्तूंची वेळ आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, आता विकी आणि कॅटरिना दोघांनाही त्यांच्या जवळच्या लोकांकडून खूप भेटवस्तू दिल्या जात आहेत. ऋतिक रोशन (Hrithik Roshan), तापसी पन्नू (Taapsee Pannu), शाहरुख खान (Shahrukh Khan) यांनी त्यांना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. तर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सलमान खान (Salman Khan) यांचीही नावे या यादीत आहेत. चला तर मग जाणून घेऊया या यादीत कोणकोणत्या कलाकारांनी कायकाय भेटवस्तू दिल्या आहेत.
कॅटरिना – विकीला मिळत आहेत महागड्या भेटवस्तू
कॅटरिना आणि विकी यांच्यासोबत काम केलेले कलाकार त्यांच्या लग्नामुळे खूप खूश आहेत आणि आता त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांना खास भेटवस्तू पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘जब तक है जान’मध्ये शाहरुखसोबत काम केलेल्या कॅटरिनाला एक उत्तम पेंटिंग भेट पाठवली आहे. ज्याची किंमत दीड लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, ऋतिक रोशनने या जोडप्याला ३ लाख रुपये किंमतीची बीएमडब्लू जी३१०आर बाइक भेट दिली आहे. त्याचप्रमाणे ‘मनमर्जिया’ची कलाकार तापसी पन्नू हिने विकीला दीड लाख किमतीचे प्लॅटिनम ब्रेसलेट भेट दिले आहे. मात्र सर्वांच्या नजरा सलमान खान आणि रणबीर कपूरच्या गिफ्टवर खिळल्या आहेत.
माध्यमांतील वृत्तानुसार, सलमान खान आणि रणबीर कपूर या दोघांनी कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांना भेटवस्तू पाठवल्या आहेत. सलमानने ३ कोटींची रेंज रोव्हर गिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. तर रणबीर कपूरने कॅटरिनाला २.५ कोटींहून अधिक किंमतीचे डायमंड नेकलेस गिफ्ट केले आहेत.
हेही वाचा :
‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत
हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर
सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ