रोखठोक कंगना: कॅटरिना कैफपेक्षा विकी कौशल ५ वर्षांनी लहान; अभिनेत्री म्हणाली, ‘चांगलंय…’


अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) गुरुवारी (९ डिसेंबर ) राजस्थानच्या सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, विकी आणि कॅटरिनाच्या लग्नावर अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगनाने सोशल मीडियावर कॅटरिनाचे नाव न घेता कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच तिने विकी आणि कॅटरिना यांच्या वयातील अंतरावरही भाष्य केले आहे. याशिवाय आता बॉलिवूडच्या यशस्वी आणि मोठ्या अभिनेत्री तरुण कलाकारांशी लग्न करून रुढीपरंपरा मोडत असल्याचेही तिने म्हटले आहे.

यशस्वी महिला मोडत आहेत रुढीपरंपरा
कंगनाने पोस्ट शेअर करून लिहिले की, “मोठे झाल्यावर यशस्वी श्रीमंत पुरुषांनी स्वत:पेक्षा वयाने लहान महिलांशी लग्न केल्याच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. महिलांना त्यांच्या पतींपेक्षा अधिक यशस्वी होणे स्वीकारले जात नाही आणि याकडे एक मोठे संकट म्हणून पाहिले जाते.”

Kangana Ranaut
Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

“अशा महिलांना तरुण मुलांशी लग्न करू द्या, वय झाल्यानंतर लग्न करणे अवघड होते, पण, आता भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकार हे बदलत आहेत. श्रीमंत आणि यशस्वी महिला लिंगभेदापासून ते रुढीपरंपरेबद्दलचे विचार बदलत आहेत. लिंग रुढीपरंपरेबद्दलची पुनर्व्याख्या केल्याबद्दल स्त्री आणि पुरुष दोघांचेही अभिनंदन,” असेही ती या पोस्टमध्ये पुढे म्हणाली.

कॅटरिना कैफ विकी कौशलपेक्षा आहे ५ वर्षांनी मोठी 
जरी कंगनाने तिच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसले, तरीही ती विकी आणि कॅटरिनाकडे बोट दाखवत असल्याचे समजते. कॅटरिना तिचा होणारा पती विकीपेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. कॅटरिना ३८ वर्षांची आहे, तर विकी ३३ वर्षांचा आहे. या वयातील अंतराकडे पाहूनच कंगनाने स्वतःची प्रतिक्रिया दिली असण्याची शक्यता आहे. वयातील हे अंतर एक चांगले पाऊल असल्याचेही तिने सांगितले आहे.

दोन वेगवेगळ्या रीतिरिवाजानुसार होणार लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना आणि विकी हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न करणार आहेत. यानंतर ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार हे लग्न होणार आहे. या दोन्ही विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लग्नमंडप तयार करण्यात आला आहे. विकी-कॅटरिना बॉलिवूडमधील काही पहिले असे जोडपे नाही, जे दोन वेगवेगळ्या रीतिरिवाजानुसार लग्न करणार आहेत. याआधीही असे अनेक स्टार्स जोड्या होत्या, ज्यांनी वेगवेगळ्या रीतिरिवाजांचा अवलंब करून लग्नात करोडो रुपये खर्च केले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!