Friday, June 14, 2024

काय सांगता! सेक्स सीन करण्यासाठी अभिनेत्रीला एक्स पतीने केली होती मदत; म्हणाली, ‘मी डोळे…’

कुठल्याही गॉडफादरशिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहणारे कलाकार खूप कमी आहेत. यामध्ये अभिनेत्री कीर्ती कुल्हारी हिचाही समावेश होतो. कीर्तीने अभिनयाच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख तयार केली आहे. कीर्ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. एकदा ती भलतीच चर्चेची धनी ठरलेली. त्यावेळी तिने तिचा पती साहिल सेहगल याच्यापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता तिचे आणि तिच्या एक्स पतीमधील नाते आता सामान्य झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कीर्तीने तिच्या आयुष्यातील खास गोष्टींचा खुलासा केला.

अभिनेत्री कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) हिने सांगितले आहे की, कशाप्रकारे तिचा एक्स पती साहिल सेहगल (Saahil Sehgal) याने ‘फोर मोर शॉट्स प्लीज’मध्ये इंटीमेट सीन करण्यासाठी तिची मदत केली होती. कीर्तीची ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ या सीरिजचा तिसरा भागही काही दिवसांपूर्वीच रिलीझ झाला होता. आता अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती या सीरिजमध्ये इंटीमेट सीन करण्यासाठी तयार नव्हती, पण यामध्ये तिच्या एक्स पतीने तिची मदत केली होती.

ती म्हणाली की, “माझे लग्न 2016मध्ये झाले होते. माझा पती साहिलने खरंच माझी खूप साथ दिली. तो असा व्यक्ती नाहीये, जो म्हणेल की, तू स्क्रीनवर किस करू शकत नाही किंवा इंटीमेट सीन देऊ शकत नाही. खरं तर, इंडस्ट्रीत असे काही आहे, जे मलाही खूपच रुढीवादी वाटते. पात्राची जी गरज आहे, त्यानुसार स्वत:ला तयार करण्यात मला आत्मविश्वास दिला आणि माझे समर्थनही केले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kirti Kulhari (@iamkirtikulhari)

“‘फोर मोर शॉट्स प्लीज’मध्ये बोल्ड सीन्स पाहण्याचा कोणत्याही मुलीचा आपला वेगळा दृष्टीकोन आहे. काहींना ते आवडत नव्हते, तर काहींना काहीच फरक पडत नव्हता. मला ते सहज वाटत होते आणि सीनमध्ये मी डोळे उघडे ठेवून जात होते. आज माझ्यासाठी सेक्स आयडिया सामान्य झाली आहे. मात्र, त्यावेळी असे नव्हते. कारण, मी ज्याप्रकारे मोठी झाली आहे, त्यामुळे मी इंटीमेट सीन करण्यात सहज नव्हते.”

पुढे बोलताना कीर्ती म्हणाली की, “साहिलने मला सांगितले की, कशाप्रकारे दुसऱ्या लग्नाचे प्रश्न हाताळले पाहिजेत.” स्वत: बद्दल बोलताना ती म्हणते की, “मी खूपच भावूक व्यक्ती होते आणि आजही मी संवेदनशीलता कायम ठेवल्या आहेत. तरीही मी माझ्यातील जास्त भावूक व्यक्तीला बाहेर काढले आहे. भावूक होणे समस्या नाहीये. गोष्टी कशाप्रकारे हाताळल्या पाहिजेत हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर ही तुमच्यासाठी समस्या असू शकते.”

कीर्तीचे सिनेमे
कीर्तीच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’, ‘पिंक’, ‘मिशन मंगल’ यांसारख्या सिनेमातही काम केले आहे. या सिनेमामुळे तिने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिला सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग लाभला आहे. इंस्टाग्रामवर तिला 14 लाख चाहते फॉलो करतात. (actress Kirti Kulhari On her intimate scene says her ex husband helped her doing intimate scenes in Four More Shots Please)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
हेमा मालिनी यांनी फाेटाे शेअर करत संसद भवनाची दाखवली सुंदर झलक, सांगितली ‘ही’ खास गाेष्ट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली पलक तिवारी; चाहते म्हणाले, ‘आई जास्त हॉट…’

हे देखील वाचा