Friday, January 27, 2023

कलाविश्व हादरले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये आगीचे तांडव, जीव वाचवण्यासाठी मुलीने मारली उडी

कलाविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. छोट्या पडद्यावर काम करणारा प्रसिद्ध अभिनेता राकेश पॉल याच्या डोळ्यादेखत भयंकर घटना घडली, ज्याबद्दल विचार करून कुणाच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. अभिनेत्याने सांगितले आहे की, त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या बिल्डिंगमध्ये आग लागली. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून प्रत्येकाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये लागली आग
झाले असे की, शनिवारी (दि. 03 डिसेंबर) सकाळी जवळपास 10.50वाजता अभिनेता राकेश पॉल (Rakesh Paul) त्याच्या शूटिंगसाठी निघणार होता. मलाड येथे त्याच्या बिल्डिंगला लागलेल्या आगीमुळे त्यालाही धक्का बसला. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आगीशी संबंधित व्हिडिओ शेअर केला. राकेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. यात त्याने सांगितले की, त्याच्यासमोर कशाप्रकारे एक मुलीने आगीच्या भीतीने बिल्डिंगमधून खाली उडी मारली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakesh Paul (@rakesh_insta_paul)

बिल्डिंगवरून मुलीने मारली उडी
माध्यमांशी बोलताना राकेश म्हणाला की, “मी माझ्या शूटिंगसाठी निघणारच होतो की, आमच्या 28मजली इमारतीत आगीचा अलार्म वाजू लागला. आम्हाला जाणवले की, हे कॉम्प्लेक्सच्या ए विंगमधील आगीचा अलार्म होता. दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. संपूर्ण विंग तातडीने रिकामी करण्यात आली होती. मात्र, ज्या फ्लॅटमध्ये आग लागली होती, तिथे एक मुलगी बाहेर येण्यासाठी संघर्ष करत होती. ती तिच्या खिडकीच्या ग्रिलवर आली आणि सर्वांनी तिला काही सेकंद वाट पाहण्यास सांगितले, जेणेकरून तिला सिडी देण्यात येईल. मात्र, ती आग पाहून घाबरली आणि तिने उडी मारली. सध्या ती रुग्णालयात दाखल आहे.”

उपस्थित लोकही घाबरले
पुढे बोलताना त्याने सांगितले की, “हे खूपच भीतीदायक दृश्य होते. सर्वकाही अचानक झाले आणि लोकही घाबरले होते. तातडीने कार्यवाही केल्यामुळे बरं झालं. आमची बिल्डिंग खूप चांगली होती. इथे लगेच फायर ब्रिगेडला बोलावण्यात आले होते, ज्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. प्रत्येक इमारतीत हे सर्व सुरक्षा उपाय असणे गरजेचे आहे. कधी काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. त्यावेळी या सर्व गोष्टी उपयोगी पडतात.”

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यावर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत प्रत्येकजण कमेंट करत आहे. तसेच, काळजी घेण्याचा सल्लाही देत आहेत. (tv actor rakesh paul building caught fire a girl jumped from height to save her life video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
असं काय झालं की, एक्स पतीशी संबंधित निर्णयाची आठवण काढत मलायका रडली ढसाढसा? पाहा व्हिडिओ
‘भेडिया’वर 16व्या दिवशीही ‘दृश्यम 2’ भारीच, आयुष्मानचा ‘ऍन ऍक्शन हिरो’ खातोय गटांगळ्या

हे देखील वाचा