Wednesday, June 26, 2024

‘भांडण करतायेत का?’ मुलगा अरहानला सोडवायला आलेल्या अरबाज- मलायकाला एकत्र पाहून उमटल्या प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही त्या अभिनेत्रींपैकी एक हे जी नेहमीच चर्चेत असते. मग ती तिचा ग्लॅमरस अवतार असो किंवा तिचे वैयक्तिक आयुष्य. मलायका आणि अरबाज खान (Arbaaz Khan) भले वेगळे झाले असतील, पण त्यांचा मुलगा अरहानसाठी दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. दोघे जरी वेगळे झाले असले, तरी ते आपल्या मुलासाठी नेहमीच एकत्र उभे असतात. याच कारणामुळे दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

यावेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते दोघे मुलगा अरहानला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी पोहोचला होते. या व्हिडिओमध्ये मलायका आणि अरबाज एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. ज्याप्रमाणे ते बोलत आहेत, त्यावरून चाहत्यांना वाटतंय की, ते भांडण करत आहेत.

चाहते म्हणाले…
व्हायरल भयानीच्या पेजवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मलायका अरबाज आणि त्यांचा मुलगा अरहान विमानतळावर दिसत आहेत. तिघांनीही मास्क घातलेले आहेत. अरहान एका मित्राला भेटताना दिसत आहे. तर अरबाज आणि मलायका यांच्यात काही बोलणे सुरू आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “भांडण.” तर दुसऱ्याने लिहिले की, “मलायका अर्जुनपेक्षा अरबाजसोबत चांगली दिसते.” चाहतेही अशाच प्रतिक्रिया देत आहेत. शेअर केल्यानंतर या व्हिडिओला दीड लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

विशेष म्हणजे मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. दोघे अनेकदा एकत्र हँग आउट करताना दिसले आहेत. चाहते अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप काहीही बोललेले नाही. २०१७ मध्ये अरबाज- मलायकाचा घटस्फोट झाला होता.

परदेशात शिकत आहे अरहान
सध्या मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहान परदेशात शिक्षण घेत आहे. अलीकडेच जेव्हा अरहान सुट्टीवर परत आला तेव्हा मलायका आणि अरबाज त्याला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा