Saturday, April 20, 2024

असं काय झालं की, एक्स पतीशी संबंधित निर्णयाची आठवण काढत मलायका रडली ढसाढसा? पाहा व्हिडिओ

बॉलिवूडच्या बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्रींमध्ये मलायका अरोरा हिचादेखील समावेश होतो. मलायका तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत असते. मागील काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांनी सर्वांना हैराण केले होते. यानंतर खोट्या बातमीवर अर्जुन कपूर यानेही राग व्यक्त केला होता. याव्यतिरिक्त आता मलायका तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळेही चर्चेचा भाग ठरत आहे. याआधीच तिने स्पष्ट केले आहे की, ती या शोमध्ये आपल्या दृष्टीकोनातून स्वत:चे आयुष्य सर्वांना दाखवेल. अशात तिने टीझर रिलीज केला आहे, ज्यात मलायका अरोरा रडताना दिसली.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिने तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ (Moving In With Malaika) या आगामी रियॅलिटी शोचा प्रोमो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या टीझरमध्ये दिसते की, मलायकासोबत करीना कपूर (Kareena Kapoor) आणि निर्माती फराह खान (Farah Khan) यादेखील आहेत.

काय म्हणाली मलायका?
फराहसोबत बोलताना मलायका म्हणाली की, “मी आपल्या आयुष्यात जे काही निर्णय घेतले आहेत, ते पूर्णत: गरजेचे होते. मी आनंदी आहे.” असे बोलल्यानंतर मलायका रडू लागते. यानंतर फराह तिचे सांत्वन करताना म्हणते की, “अरे, तू रडतानाही सुंदर दिसतेस.” यासोबतच मलायका ट्रोलर्सला पुढे जाण्याचा सल्लाही देते. ती म्हणते की, “मी पुढे निघून गेले आहे. माझा एक्सही पुढे गेला आहे. आता तुम्हा सर्वांना पुढे जायला कधी आवडेल?” इतकेच नाही, तर या व्हिडिओत करीना मलायकाची प्रशंसा करत म्हणते की, “मला वाटते की, मलायका मजेशीर, हॉट, सुंदर आहे. ती रॉक सॉलिड आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाचे कॅप्शन
मलायकाने हा व्हिडिओ शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले आहे की, “वेळ आली आहे, आता सर्वांना आतमध्ये यायचे. पाहूया मी स्वत:ला सुरक्षित ठेवू शकते की नाही. मूव्हिंग इन विथ मलायका शो 5 डिसेंबरपासून सुरू होत आहे.”

या व्हिडिओत मलायका ज्याप्रकारे तिच्या आयुष्यातील निर्णयांबद्दल आपले मत मांडत आहे, ते पाहून असे वाटते की, अभिनेत्री शोमार्फत ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. या शोमध्ये मलायका आणखी काय काय खुलासे करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (actress malaika arora shares teaser of her show cried remembering her decision about arbaaz khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘भेडिया’वर 16व्या दिवशीही ‘दृश्यम 2’ भारीच, आयुष्मानचा ‘ऍन ऍक्शन हिरो’ खातोय गटांगळ्या
जेव्हा शशी कपूरांनी शर्मिला टागोर यांची केलेली मस्करी; म्हणाले होते, ‘जेनिफर तुझ्याकडे दुधाचे पैसे…’

हे देखील वाचा