ख्रिसमस पार्टीत पोहोचताच मलायका अरोराला तिच्या हाय हिल्सने दिला धोका, अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था


पार्टीचा प्रसंग आणि मलायका अरोराचा लूक चर्चेत येणार नाही, असे कधी होऊच शकत नाही. नुकतीच मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत करिश्मा कपूरच्या घरी पोहोचली. करिश्माच्या ख्रिसमस पार्टीत मलायकाने रिव्हीलिंग ड्रेससह हाय हिल्स घातले होते. पण यादरम्यान मलायकाला तिच्या हाय हिल्सने दगा दिला आणि ती पडता-पडता वाचली. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पडता-पडता वाचली अभिनेत्री

मलायका (Malaika Arora) करिश्मा कपूरच्या ख्रिसमस पार्टीमध्ये सर्वात हॉट आणि रिव्हिलिंग ड्रेस परिधान करून पोहोचली होती. मलायका कारमधून उतरून करिश्माच्या घरी पोहोचताच फोटोग्राफर्स तिच्याकडे वळले. मलायकाने ब्रॅलेटवर वेल्वेट श्रग परिधान केला होता. यासोबतच सिल्व्हर कलरच्या हाय हिल्स घातला होता. मलायका कारमधून खाली उतरताच तिच्या पायाचा बॅलन्स बिघडला आणि ती अडखळली. यादरम्यान मलायकाजवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने तिचा हात पकडला आणि तिला सांभाळले.

अर्जुन कपूरने होल असलेला स्वेटशर्ट केला परिधान

या ख्रिसमस पार्टीत मलायका बोल्ड लूकमध्ये दिसली, तर अर्जुन कपूर होल असलेला स्वेटशर्ट परिधान केलेला दिसला. समोर आलेल्या फोटोंमध्ये अर्जुन कपूरचा स्वेटशर्ट कॅमेऱ्यात कैद होताच त्याच्या स्वेटशर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अर्जुनचा लूक मलायकाच्या तुलनेत थोडासा कॅज्युअल दिसत होता.

मलायका आणि टेरेन्सचा डान्स व्हिडिओ झाला होता व्हायरल

मलायका तिच्या ड्रेसमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच त्याचा आणि टेरेन्स लुईसचा एक डान्स व्हिडिओ चर्चेत आला होता. खरंतर, मलायका अरोरा सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन २’ या रियॅलिटी शोचे परीक्षण करत आहे. मलायका व्यतिरिक्त या शोमध्ये टेरेन्स लुईस आणि गीता कपूर देखील परीक्षक आहेत. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा आणि टेरेन्स लुईस एकत्र स्टेजवर दिसणार आहेत. गाणे लागते आणि मलायका डान्स करू लागते. मात्र आपल्या डान्समध्ये व्यस्त असलेला टेरेन्सचा मलायकाच्या कंबरेवर हात पडताच तो असे हावभाव करू लागला की, पाहून तुम्हालाही लाज वाटेल. या व्हिडिओची सर्वत्र खूप चर्चा झाली.

हेही वाचा :

बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला

‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 


Latest Post

error: Content is protected !!