बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला


कलाकारांना लग्नांमध्ये बोलवणे आणि त्यांचे परफॉर्मन्स ठेवणे हे आजकाल खूपच सामान्य झाले आहे. अनेक कलाकार अशा खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी बक्कळ फी चार्ज करतात. मात्र जरा विचार करा, तुमच्या घरात कोणाचे लग्न आहे, किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या लग्नात सामील होण्यासाठी गेले आहेत, आणि अचानक तिथे मिका सिंगने हजेरी लावली तर? तर काय सगळीकडे एकच कल्ला होणार सवालच नाही. न बोलवता मिका सिंग लग्नात येऊन गाणे गायला लागला हा विचारच स्वप्नवत वाटतो ना. मात्र हीच स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात घडली आहे.

नुकतेच गायक राहुल वैद्य आणि मिका सिंग यांनी एका लग्नात न बोलवताच हजेरी लावली आणि स्टेजवर जाऊन गाणे गायला सुरुवात केली. मिका सिंगने स्टेजवर जाऊन माईक हातात घेत ”सावन में लग गई आग’ गाणे गायला सुरुवात केली. सोबतच नवरदेव आणि नवरीला शुभेच्छा देखील दिल्या. निकाल एकदम अचानक पाहून उपस्थित सर्वच पाहुणे हैराण झाले आणि त्याला भेटण्यासाठी एकच गोंधळ उडाला.

मिकाने या लग्नाचा गेट क्रश व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले, “तुमची प्रतिक्रिया काय असेल जर मिका सिंग तुमच्या लग्नात न बोलवताच पोहचला तर?” निकाल गाणे गाताना पाहून पाहुण्यांना आणि स्टेजवर गाणे गाणाऱ्या गायिकेला तर काही सुचतच नव्हते.

मिकाने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही काळातच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मिका आणि राहुलवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्या दोघांनी या लग्नाला अशी अचानक भेट दिल्यामुळे सर्वांनाच जो आनंद झाला तो अमूल्य असल्याचे त्यांनी कमेंट्समध्ये म्हटले आहे. एकाने लिहिले, “हे माझे आवडते गाणे आहे आणि तू माझा आवडता गायक आहे’, अजून एकाने लिहिले, “मी जेव्हा लग्न करेल तेव्हा तू असेच कर’. मिका बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी गायकांपैकी एक असून, त्याने आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!