‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा


बिग बॉस मराठी‘च्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. विशाल निकमने या पर्वाच्या ट्रॉफीवर त्याचे नाव कोरले आहे. त्याचे चाहते या बातमीने खूप खुश झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु या सगळ्यात विशालला एक खास व्यक्तीने शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणजे बिग बॉसच्या त्याच्या पर्वातील एक महत्वाचा व्यक्ती म्हणजेच विकास पाटील. विकास आणि विशालची मैत्री आख्ख्या महाराष्ट्राने पाहिली आहे. केवळ मैत्री नाही तर ते एकमेकांचे भाऊ असल्याप्रमाणे वागत होते. अशातच विकासने सोशल मीडियावर त्याचा आणि विशालचा एक व्हिडिओ शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

विकासने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही बिग बॉसच्या सेटवर दिसत आहे. विशालची ट्रॉफी दोघांनी ही हातात धरली आहे. ट्रॉफी घेऊन ते ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे गाणे म्हणत आहेत. या व्हिडिओमधून त्या दोघांची मैत्री साफ दिसत आहे. (vikas patil congratulate to vishal nikam on social media)

हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “ही दोस्ती तुटायची नाय! जिंकलास रे भावा , तु स्टार हे
मनापासून अभिनंदन भावा, तुला आयुष्यातील पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा, तुझा हा मोठा भाऊ नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे. I love you भावा.” त्यांचा या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘आख्खा महाराष्ट्र बघतोय’ असे, म्हणत विकासने आख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी नेहमीच प्लॅन करून बिग बॉसच्या घरातील खेळ खेळला आहे. विशाल आणि विकासमध्ये अनेक वाद झाले. परंतु त्यांच्या मैत्रीत कधीही कटुता आली नाही. त्यांनी त्यांचे वाद मिटवून नेहमीच एका नवीन नात्याला सुरुवात केली. याची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. घरात जेव्हा विशालच्या कॅप्टन्सीसाठी विकासला टक्कल करण्यासाठी सांगितला होता तेव्हा त्याने कोणताही विचार न करता केस काढले होते. तेव्हा विशालने देखील टक्कल केला होता. त्यांची हीच निरपेक्ष आणि निस्वार्थी मैत्री प्रेक्षकांना खूप आवडते.

हेही वाचा :

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘सगळं तुमच्यामुळे शक्य झालं,’ म्हणत बिग बॉस मराठीचा उपविजेता जय दुधानेने मानले चाहत्यांचे आभार

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

 


Latest Post

error: Content is protected !!