×

घटस्फोटानंतर त्रासातून बाहेर पडण्यासाठी मलायका करत होती ‘हे’ काम, म्हणाली ‘माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट…’

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. त्याचबरोबर मलायका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्यासह मलायका नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. अभिनेत्रीने आता एक्स पती अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्याची चर्चा आहे. मलायकाने तिच्या आयुष्यातील हा टप्पा सर्वात वाईट असल्याचे सांगितले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, मलायका (Malaika Arora) म्हणाली की, एक्स पती अरबाज खानसोबत तिचे आयुष्य वेगळे करण्यासाठी तिने योग आणि ध्यानाची मदत घेतला. ती म्हणाली की, “मी असे जगू शकत नाही, कारण माझ्या निर्णयाचा माझ्या आजूबाजूच्या सर्व जीवनावर परिणाम होणार होता. आम्ही एक जोडपे म्हणून आणि पती-पत्नीने एकत्र ठरवले की, हे सर्वोत्तम आहे.”

Arbaaz Khan opens up on divorce with Malaika Arora: Everything seemed fine,  but it crumbled - Movies News

मलायका पुढे म्हणाली की, “हा नक्कीच माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात वाईट टप्पा होता. तेव्हा मी योग, ध्यान यासारख्या अनेक गोष्टींकडे वळले. कारण मला वाटले की, हा आंतरिक गोंधळातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. जो मला चांगल्या मार्गाने पुढे जाण्यास मदत करेल.”

Arbaaz Khan - Malaika Arora Khan to move-in together?

मलायकाला कौटुंबिक दबावातून जावे लागले

मलायकाने मुलाखतीत खुलासा केला की, समाजाची प्रतिक्रिया कशी असेल आणि तिचा १९ वर्षांचा मुलगा अरहान खान यावर कसा प्रतिक्रिया देईल याचाही तिने विचार केला होता. ती म्हणाली की, “मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आव्हानांचा सामना केला. मी वियोगाच्या वेदनातून गेले. मला कौटुंबिक दबावाचा सामना करावा लागला. माझा मुलगा या सर्व गोष्टींना कसे सामोरे जाईल, मी कसे सामोरे जाईन या चिंतेतून मी गेले होते.”

घटस्फोटानंतर मलायका अरोराला करावा लागला अडचणींचा सामना

मलायका पुढे म्हणाली की, “सोसायटी कशी असेल, मी काम करू शकेन का? मी जशी आहे तशी राहू शकेन का? हे सगळे विचार माझ्या मनात घुमत होते. माझ्या मते हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा होता, कारण तेव्हा माझ्या आयुष्यात खूप गडबड झाली आणि मला या बदलाला सामोरे जावे लागले. हे फक्त माझ्याबद्दल नव्हते. यामध्ये कुटुंबाचाही सहभाग होता. माझ्या मुलाचाही यात सहभाग होता, इतरही अनेक पैलू यात सामील होते.”

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा २०१७ मध्ये झाला घटस्फोट

मलायका आणि अरबाज १९९८ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २०१७ मध्ये त्यांनी अधिकृतपणे एकमेकांना घटस्फोट दिला. हे जोडपे आता १९ वर्षांच्या अरहान खानच्या मुलाचे पालक आहेत. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. ज्याच्यासोबत ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचा :

Latest Post