×

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर प्रियांका आणि निक करतायेत दुसऱ्या बाळाचा विचार, अभिनेत्रींच्या जवळच्या व्यक्तीने दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १ डिसेंबर २०२० मध्ये लग्न केले. या दोघांच्या जोडीला चाहत्यांनी भरभरून पसंती दिली. या दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली की, ते दोघे सरोगसीद्वारे आई बाबा झाले आहेत. या बातमीने चाहत्यांना देखील फार आनंद झाला. प्रियांका आणि निकच्या एका जवळच्या व्यक्तीने अजून एक आनंदाची बातमी दिली की, ते अजून एका बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहे.

प्रियांका चोप्राने (priyanka chopra)  शनिवारी आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली की, ती आणि निक आई बाबा झाले आहेत. ते दोघे सरोगसी पद्धतीनी आईबाबा झाले आहेत. ही बातमी जेव्हा त्यांच्या चाहत्यांना समजली तेव्हा त्यांनाही फार आनंद झाला. अशातच प्रियांकाची बहीण मीरा चोप्राने प्रियांकाने एका मुलीचे स्वागत ही बातमी चाहत्यांना दिली. (priyanka chopra and nick jonas thinking about their second child)

प्रियांका आणि निकला दोन मुलांची इच्छा होती. सरोगसी पद्धतीने एका मुलीचे आई बाबा झाले. त्यानंतर ते दोघे आणखी एका बाळाचा विचार करत आहेत. ही गोष्ट त्यांनी जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना सांगितली तेव्हा त्यांना देखील खूप आनंद झाला.

निक जोनासचा भाऊ केविन जोनस याला दोन मुली आहेत. ही आनंदाची बातमी प्रियांकाने मध्यरात्री सोशल मीडियावर सगळ्यांना दिली. ही बातमी देत असताना निकला टॅग करत ती म्हणाली की, “सरोगसी पद्धतीने आम्ही मुलीचे स्वागत करत आहोत. आम्ही सन्मानाने सांगू इच्छितो की, आम्हाला आमचा वैयक्तिक वेळ द्यावा. आम्ही सध्या कुटुंबाकडे लक्ष देत आहोत. धन्यवाद.”

प्रियंका चोप्रा एका जुन्या मुलाखतीमध्ये आपल्या मुलीबद्दल बोलत आहे. तो व्हिडिओ व्हायरल होताना सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी आपल्या मुलीबद्दल व्यक्त झाली होती. ती म्हणाली की, “माझ्या मुलीसाठी नवीन ट्रेंड करू इच्छिते. परंपरागत चालत आलेली आरशाच्या भिंती असलेली घरं मला मुलीसाठी बांधायची नाहीयेत. मला त्याची चौकट मोडायची आहे.” त्यामुळे प्रियांकाला तिच्या होणाऱ्या बाळाचे लिंग आधीच माहित होते असा देखील तिच्यावर आरोप लावला जात आहे.

हेही वाचा :

 

 

Latest Post