Wednesday, March 22, 2023

राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त हेमा मालिनी यांनी केले मुलींसोबत फोटो शेअर, म्हणाल्या, ‘मला अभिमान वाटत आहे…’

जगात कुठले नाते सर्वश्रेष्ठ मानले जात असेल, तर प्रत्येकाच्या ओठावर सर्वप्रथम आई आणि मुलाचं नाव येते. त्याचप्रमाणे माय-लेकीचे नाते देखील प्रचंड मायेचे असते. कोणत्याही मुलीला आपल्या आईपासून दूर राहणे खूप कठीण असते. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही अनेक माय-लेकीच्या जोड्या आहेत. ज्या त्यांच्या बाँडिंगमुळे चर्चेत येत असतात. बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी या ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुलींच्या आई आहेत. सोमवार (२४ जानेवारी) ‘राष्ट्रीय बालिका दिना’च्या निमित्ताने हेमा यांनी सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर करून आपल्या मुलींना स्पेशल फिल करून दिले आहे. या फोटोमध्ये हेमा त्यांच्या दोन मुली आणि पती धर्मेंद्रसोबत दिसत आहे.

हेमा मालिनी यांनी थ्रोबॅक फोटो केला शेअर

खरंतर हेमा (Hema Malini) यांनी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो ईशा आणि अहानाच्या लहानपणाचा आहे, ज्यामध्ये दोघी खूप क्यूट दिसत आहेत. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये ईशा तिची आई हेमा यांच्या खांद्यावर, तर अहाना तिचे वडील धर्मेंद्र यांच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. या दरम्यान दोघेही दुसरीकडे पाहत हसत आहेत. मात्र, यावेळी हेमा यांचे एक्स्प्रेशन खूपच विचित्र आहे आणि धर्मेंद्रही हसत आहेत.

हेमा यांनी लिहिले एक सुंदर कॅप्शन

हेमा यांनी या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शन लिहून सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या दोन्ही मुलींचा अभिमान आहे. हेमा यांनी लिहिले की, “आज मुलींचा दिवस आहे. माझ्या आयुष्यात माझ्या दोन मुली असल्याचा खूप अभिमान वाटतो.”

हेमा मालिनी या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करतात

हेमा मालिनी यांचे त्यांच्या दोन्ही मुलींसोबत सुंदर नाते आहे. गेल्या वर्षी हेमा मालिनी ‘इंडियन आयडल’ या रियॅलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. यादरम्यान हेमा यांनी ईशाने पाठवलेला व्हिडिओ मेसेज दाखवला. या व्हिडिओ मेसेजमध्ये ईशाने २०१२ मध्ये झालेल्या तिच्या आणि भरत तख्तानीच्या लग्नाबद्दल सांगितले. ईशाने सांगितले की, तिची आई हेमा मालिनी संपूर्ण फंक्शनमध्ये कशी मजबूत राहिली पण शेवटी ती स्वतःला ब्रेकअप होण्यापासून रोखू शकली नाही. ईशाचा हा मेसेज पाहून हेमा मालिनी भावुक झाल्या. यादरम्यान त्यांनी ईशाला आपली लाडकी मुलगी असल्याचे सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, त्यांना वाटले की, लग्नानंतर ईशा त्यांच्यासाठी एक मुलगा घेऊन आली आहे.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा