मौनी रॉयने केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचे छापी साेडली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील मौनीची भूमिका छोटी पण दमदार आहे. छोट्याशा भूमिकेत या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने समीक्षक आणि चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अभिनयासोबतच 28 सप्टेंबर 1985 रोजी कूचबिहारमध्ये जन्मलेली मौनी तिच्या सौंदर्य मुळेही चर्चेत असते. चला तर आज माैनी राॅयच्या वाढदिवसानिमत्य जाणून घेऊया काही खास किस्से…
मौनी रॉयने केली ओठांची शस्त्रक्रिया
मौनी रॉय (Mouni roy) हिने ओठांची शस्त्रक्रिया केल्यानंतर जेव्हा ती मीडियासमोर आली तेव्हा तिने लोकांचे लक्ष वेधून घेतले. लोकांनी तिच्यावर जोरदार टीका केली. मात्र, याबाबत अभिनेत्रीला विचारले असता तिने प्लास्टिक सर्जरीच्या चर्चेला बकवास म्हटले होते.
निर्मात्यांनसाेबत मौनी रॉयची अनप्रोफेशनल वागणूक
माध्यमांतील वृत्तांनुसार, मौनी रॉय नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडिया’मध्ये दिसणार होती. मात्र, निर्मात्यांना माैनिची वागणूक अनप्रोफेशनल वाटल्यानं तीला या प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आले.
अभिनेताने लावले अमित टंडनवर गंभीर आरोप
अभिनेता अमित टंडनने मौनी रॉयवर गंभीर आरोप लावले होते. त्यांनी सांगितले की, अभिनेत्रीने त्याची पत्नी रुबी टंडनचा गैर वापर केला आहे. त्यामुळं त्याला तिचा चेहरा पुन्हा कधीच पाहायचा नाही.
टीव्ही मालिकेतून करिअरची सुरुवात
मौनी रॉयने 2006 मध्ये एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये ती कृष्णा तुळशीची भूमिका साकारत होती.
पंजाबी सिनेमातही केलं माैनी राॅयने काम
मौनी रॉयने ‘हीरो हिटलर इन लव्ह’ या पंजाबी सिनेमातही काम केले होते. पण जेव्हा काही काम जमले नाही तेव्हा ती पुन्हा टीव्हीकडे वळली.
तीन वर्ष डेट केल्यनंतर अखेर अडकली विवाह बंधनात
मौनी रॉयने तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर 27 जानेवारी 2022 रोजी दुबईतील उद्योगपती सूरज नांबियारशी लग्न केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अर्जुन कपूरकडून रणबीरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा! म्हणाला, ‘मी तुला 40 वर्षे कुशीत वाढवले आणि तू…’
नेपोटिझमवरून संतापले ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक; म्हणाले, ‘बॉलिवूडनं बाहेरच्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं’










