Wednesday, December 6, 2023

अर्जुन कपूरकडून रणबीरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा! म्हणाला, ‘मी तुला 40 वर्षे कुशीत वाढवले आणि तू…’

सतत प्रसिद्धीच्या झोतात असलेला रणबीर कपूर याने बुधवारी (दि. 28 सप्टेंबर) त्याचा 40वा वाढदिवस साजरा केला. रणबीरसाठी 2022 हे वर्ष खूप लकी आहे. हे वर्ष अभिनेत्यासाठी केवळ वैयक्तिकच नाही, तर व्यावसायिक दृष्टीनेही खूप खास आहे. अभिनेत्याला आलिया भट्ट हिच्या रुपात जीवनसाथी मिळाला आणि आता ताे बाबा होणार आहे. इतकेच नाहीतर ताे सध्या त्याच्या ‘ब्रह्मास्त्र‘ चित्रपटाच्या यशाचा आनंद देखील घेत आहे.

अशात बॉलिवूडचा ‘रॉकस्टार’ रणबीर कपूर (Ranbir kapoor) याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर चाहत्यांपासून ते  इंडस्ट्रीतील त्याच्या सेलिब्रिटी मित्रांपर्यंत सर्वजण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. रणबीरचा अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्यासोबतही खास बाँड आहे. ते जिवलग मित्र आहेत आणि अनेकदा खास प्रसंगी एकत्र दिसतात. आता रणबीरच्या वाढदिवशी मित्र अर्जुनने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

साेशल मीडियावर अर्जुनने दिल्या शुभेच्छा 
अर्जुन कपूर याने इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर करत रणबीरला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याने एक फाेटाे शेअर केला आहे, ज्यात ताे आणि रणबीर दिसत आहे. या फाेटाेला पाेस्ट करत अर्जुननं झक्कास कॅप्शन दिलं. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “40 वर्षे मी तुला माझ्या कुशीत वाढवले ​​आणि आज तू अग्नी झाला आहेस. मला तुझा अभिमान आहे.”

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

चाहते या पोस्टचे कॅप्शन वाचताच त्यांचे हसू आवरत नाहीये. त्याचबरोबर या पोस्टवर चाहतेही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा- जीतेंद्र यांची पत्नी अन् लेक जाणार खडी फोडायला? बिहारच्या न्यायालयाने बजावले अटक वॉरंट

मध्यरात्रीपर्यंत रणबीरच्या घरी चालली पार्टी
पत्नी आलिया भट्टने रणबीरचा 40वा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. रणबीरसाठी आलियाने एका खास पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात बी टाऊनचे प्रसिद्ध लाेक उपस्थित होते. या पार्टीचे आमंत्रण कुटुंबीयांसह खास मित्रांनाही देण्यात आले होते. या पार्टीत करण जोहर, नीतू कपूर, शाहीन भट्ट, अयान मुखर्जी, रोहित धवन, आदित्य रॉय कपूर व्यतिरिक्त अनेक कलाकार पोहोचले आणि एकत्र रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नेपोटिझमवरून संतापले ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक; म्हणाले, ‘बॉलिवूडनं बाहेरच्यांचं करिअर उद्ध्वस्त केलं’
लता दीदींच्या आठवणीत भावूक झाले पंतप्रधान मोदी, अयोध्येतील चौकाला दिले गानकोकिळेचे नाव

हे देखील वाचा