भलत्याच फॅशनमुळे शाहिद कपूरची अभिनेत्री झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘दीदी, शर्टचे बटण बंद कर’


सध्या आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यात आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मृणाल ठाकूर होय. मृणालच्या चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. तिने २०१८ मध्ये ‘लव्ह सोनिया’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर, सशक्त भूमिका निवडून बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. मृणाल आधीच २०२१ या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या दोन चित्रपटांचा एक भाग राहिली आहे. एक म्हणजे ‘तूफान’ आणि दुसरा ‘धमाका’  होय. ‘तूफान’मध्ये तिच्यासोबत फरहान अख्तर होता, तर ‘धमाका’मध्ये तिने कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर केली होती. पण आता नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

विचित्र फॅशनमुळे झाली ट्रोल
सध्या शाहिद (Shahid Kapoor) आणि मृणाल (Mrunal Thakur) आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशन दरम्यान, मृणाल लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाच्या लेदर पॅन्टमध्ये दिसली. आकर्षक दिसण्यासाठी तिने शर्टची बटणे लावली नव्हती, पण सोशल मीडियावर ही फॅशन चाहत्यांना आवडली नाही.

अशा मिळाल्या कमेंट्स
यावर नेटकऱ्यांनी मृणालला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने लिहिले, “अरे, शर्टचे बटण बंद कर दीदी.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बटण लावल्यावर काय जात आहे का?” अनेकजण तिला ट्रोल करत असले, तरीही मृणालची स्तुती करणारे देखील आहेत, पण ही फॅशन नेटकऱ्यांनी आवडली नाही, हे या कमेंट्स सांगत आहेत.

हा चित्रपट येणार वर्षाच्या शेवटच्या दिवशी
मृणालचा पुढचा चित्रपट ‘जर्सी’ वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. स्पोर्ट्स ड्रामामध्ये शाहिद कपूर हा माजी क्रिकेटपटू आणि एक असहाय बाप म्हणून दाखवण्यात आला आहे, ज्याला आपल्या मुलाची क्रिकेट ‘जर्सी’ मिळवण्याची इच्छा पूर्ण करायची आहे. मृणाल ठाकूर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्यांच्या ट्रेलरमधील केमिस्ट्रीने आधीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मृणाल पुढे फॅमिली ड्रामा ‘आंख मिचोली’ आणि वॉर ड्रामा ‘पिप्पा’ मध्ये शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टरसोबत दिसणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!