नयनतारा (Nayanthara) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. तिने तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. नुकतेच तिने रजनीकांत यांच्यासोबत ‘अन्नात्थे’ (Annaatthe) या चित्रपटात काम केले आहे. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला आहे. या चित्रपटानंतर नयनतारा खूपच चर्चेत आली आहे. यासोबतच ती तिच्या नवीन घरामुळे देखील खूप चर्चेत आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्रीचा ‘अन्नात्थे’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर तिने चेन्नईमध्ये घर खरेदी केले आहे, जिथे ती लवकरच शिफ्ट होणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, नयनताराने चेन्नईमधील पोएस गार्डन भागात ४ बीएचके अपार्टमेंट खरेदी केला आहे. तिचे हे आपर्टमेंट खूपच शानदार आहे. असे म्हटले जात आहे की, ती शुभ मुहूर्त पाहून लवकरच तिच्या या नव्या घरात शिफ्ट होणार आहे. पोएस गार्डन हा चेन्नईमधील पॉश एरियापैकी एक आहे. तमिळनाडूमधील दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या भागामध्ये राहत होत्या. तसेच, रजनीकांत यांचे घर देखील याच भागात राहतात. यासोबतच धनुष देखील याच भागात राहतो. त्याचे घर देखील रजनीकांत यांच्या घराच्या जवळच आहे. (Sauth actress Nayanthara bought a luxurious house in the posh area of chennai)
नुकतेच काही दिवसांपूर्वी नयनताराने तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला आहे. यावर्षी अभिनेत्रीने तिचा वाढदिवस तिचा होणारा पती विघ्नेश शिवन याने दिग्दर्शन केलेला चित्रपटाच्या सेटवर साजरा केला. या वाढदिवसाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी समंथा, विजय सेतुपती यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.
नयनतारा आणि विघ्नेश यांनी मागच्या वर्षी साखरपुडा केला आहे. तसेच, ते लवकरच लग्न करणार आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, नयनतारा आणि विघ्नेश २०२२ मध्ये लग्न करणार आहेत, परंतु त्या दोघांनी अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘अंतिम’ने मोडला आयुषच्या ‘लव्हयात्री’ चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई
-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद
-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा