Tuesday, June 25, 2024

‘अंतिम’ने मोडला आयुषच्या ‘लव्हयात्री’ चित्रपटाच्या कमाईचा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

आयुष शर्मा आणि सलमान यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना त्याच्याकडे चांगलेच आकर्षित केले आहे. हा चित्रपट मराठीमधील सुपरहिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक आहे. आयुष शर्माचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी त्याने ‘लव्हयात्री’ या चित्रपटात काम केले आहे. त्याचा ‘लव्हयात्री’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत वरीना हुसैन मुख्य भूमिकेत होती.

‘अंतिम’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आयुषच्या ‘लव्हयात्री’ चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, या चित्रपटाने पहिल्या दिवशी २ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २ कोटी ११ लाख रुपयांची कमाई केली. आयुषच्या या चित्रपटात त्याच्या मागील चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

‘अंतिम’ हा आयुषचे ग्रँड ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहे. आयुषच्या दोन्ही चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. त्याच्या ‘लव्हयात्री’ चित्रपटाची एकूण कमाई १८.१४ कोटी रुपये होती. (Box office became Aayush Sharma top opening day grosser as beat loveyatri)

‘अंतिम’ चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात सुरुवातीला सलमान खानच्या विरुद्ध अभिनेत्री प्रज्ञा जायसवालला साईन केले होते, परंतु नंतर काही सीन्स शूट केल्यानंतर तिला काढण्यात आले. या चित्रपटात सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करणार आहे, असा अंदाज सगळेजण लावत आहेत. मराठीमधील ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट देखील सुपरहिट झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा