Friday, March 29, 2024

Holi 2022 | नीतू यांनी कपूर कुटुंबाचा अनसीन व्हिडिओ केला शेअर, राज कपूर ते ऋषी कपूरपर्यंतची दिसली झलक

चित्रपटसृष्टीत जेव्हा जेव्हा होळी पार्टीचा उल्लेख येतो तेव्हा कपूर घराण्याची होळी सर्वांनाच आठवते. राज कपूर (Raj Kapoor) यांची होळीची पार्टी इतकी मोठी आणि धमाकेदार असायची की, त्यात कलाकारांचा मेळावा यायचा. त्या दिवसांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होत असत. मात्र, आता ते युग राज कपूर यांचे नाही. पण आज होळीच्या निमित्ताने नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर त्या पार्टीचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ शेअर करून त्यावेळच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. नीतू कपूर, राज कपूर, शम्मी कपूर (Shammi kapoor) ते रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

सर्वजण होळीच्या रंगात कसे तल्लीन झाले आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोणी एकमेकांवर रंग फेकत आहेत, तर कोणी पाण्यात भिजताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना नीत कपूरने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ”जेव्हा ते पूर्ण व्हायचे… जेव्हा प्रेमाची उष्णता होती. होळीच्या शुभेच्छा.” राज कपूर यांनी या व्हिडिओला व्हॉईस ओव्हरही दिला आहे. नीतू यांच्या या व्हिडिओवर काही प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही कमेंट करत त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज कपूर यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबाची होळी पार्टी बंद करण्यात आली होती. त्याचवेळी शम्मू कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर हेही या जगात नाहीत.

ऋषी कपूर या जगात नसले तरी लवकरच त्यांचा ‘शर्मा जी नमकीन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत, त्यामुळे वडिलांच्या चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी त्यांचा मुलगा रणबीर कपूरने घेतली आहे. फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्याच्या इंस्टाग्रामवर रणबीरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो चित्रपटाबद्दल बोलताना भावूक झालेला दिसत आहे.

‘जुग जुग जिओ’मध्ये दिसणार नीतू कपूर
नीतू कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्या लवकरच ‘जुग जुग जिओ’मध्ये दिसणार आहे. राज मेहता दिग्दर्शित या फॅमिली ड्रामामध्ये वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा