‘मी गोड आहे, असं समजू नका…’, म्हणत निक्की तांबोळीने केला नवीन फोटो शेअर


निक्की तांबोळी टीव्हीवरील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत आघाडीवर असतात. ती नेहमीच आपल्या नवनवीन फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेचा विषय ठरत असते. काही काळापूर्वी ती ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. या शोमधून तिला जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती नुकतीच ‘खतरों के खिलाडी ११’ची शूटिंग पूर्ण करून केपटाऊनवरून परतली आहे. अशातच आता तिने एक शानदार फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो भलताच व्हायरल होत आहे.

गुलाबी ड्रेसमधील फोटो केला शेअर
निक्की तांबोळीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोत निक्कीने गुलाबी रंगाचा सुंदर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. फोटोत तिने केस मोकळे सोडले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी स्टायलिश झाला आहे. (Actress Nikki Tamboli Shared Photo And Said Dont Think Im Sweet)

हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी गोड आहे, असं समजू नका. कारण मी गुलाबी नेसले आहे.” तिचा हा फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून तिच्या या फोटोला जबरदस्त पसंती मिळत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त ३ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

‘या’ रियॅलिटी शोमध्ये दिसणार
निक्की ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. यादरम्यान तिने टॉप ३ फायनालिस्टमध्येही आपले स्थान मिळवले होते. या शोमधून तिला अफाट प्रसिद्धी मिळाली. यानंतर ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली. आता ती टीव्हीवर येणाऱ्या ‘खतरों के खिलाडी ११’ शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहिद कपूरची पत्नी मीरा तिच्या छोटा स्कर्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या मुलीचा स्कर्ट घातलाय का?’

‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल

नादच खुळा! अंकुश राजाचे नवीन गाणे रिलीझ होताच झाले व्हायरल; नीलम गिरीच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष


Leave A Reply

Your email address will not be published.