शाहिद कपूरची पत्नी मीरा तिच्या छोटा स्कर्टमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या मुलीचा स्कर्ट घातलाय का?’


मनोरंजनसृष्टीमध्ये पाहिले तर कलाकारांना तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते. सोशल मीडियावर तर कलाकारांना लाखो लोक फॉलो करतात. एखादा कलाकार जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा त्याचे कुटुंब देखील पर्यायाने प्रकाशझोतात येते. आजच्या काळात पाहिले तर अभिनेत्यांइतक्याच त्यांच्या पत्नी देखील प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. मग त्यांच्या पत्नी स्वतः मनोरंजनात कार्यरत नसल्या तरी त्या लोकप्रिय आहेतच.

आता शाहिद कपूरच्या पत्नीचे मीरा राजपूतचेच बघा. जेव्हापासून शाहिदने मीरासोबत लग्न केले, तेव्हापासून ती नेहमी विविध कारणांनी मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. बऱ्याचदा तिचे फोटो देखील व्हायरल होत असतात. मीरा स्वतः सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती नेहमी तिच्या मुलांच्या ऍक्टिव्हिटी, त्यांचे सुट्यांचे फोटो आदी अनेक गोष्टी पोस्ट करताना दिसते. सध्या मीरा पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ.

मीराच्या या नव्या व्हिडिओमध्ये ती अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल अवतारात दिसत आहे. मात्र तरीही ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर असलेल्या व्हायरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओला तुफान लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये मीराने ब्राऊन रंगाचा डीप नेक हॉट टॉप घातला असून, सोबत पोलका डॉट प्रिंटचा अतिशय लहान स्कर्ट घातला आहे. घरातून बाहेर पडून गाडीपर्यंत जाणाऱ्या मीराच्या या व्हिडिओमध्ये, ती गाडी बसताना लहान स्कर्टमुळे थोडी अस्वस्थ देखील वाटली.

एकीकडे मीराचा हा व्हिडिओ आणि हा लुक नेटकऱ्यांमध्ये चांगला गाजत असताना, दुसरीकडे ती याच लूकमुळे ट्रोल देखील होत आहे. या व्हिडिओवर यूजर्सने कमेंट्स करत तिला ट्रोल केले आहे. मीराच्या अतिशय लहान स्कर्टवर या कमेंट्स येत आहे. एकाने लिहिले की, “तू तुझ्या मुलीचा स्कर्ट घातला आहेस का?” तर एकाने लिहिले, “तू खूपच मोठा स्कर्ट घातला आहेस.” तर एकाने तिला, “ट्रॉफी वाइफ” म्हटले आहे.

शाहिद कपूर लवकरच गौतम तिन्ननुरी दिग्दर्शित ‘जर्सी’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारत आहे. मध्ये काही दिवसांपूर्वी मीरा चित्रपटांमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या खूपच व्हायरल झाल्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.