स्वागत है! अक्षय कुमारसोबत झळकलेल्या अभिनेत्रीचे ५ वर्षांनंतर पुनरागमन, अभिषेक बच्चनसोबत दिसणार ‘या’ चित्रपटात

Actress Nimrat Kaur Comeback On Film Acter Five Year She Is Very Much Excited For Film Dasvi


बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या खासगी कारणासाठी काही काळ चित्रपटातून ब्रेक घेतात. यावेळी काही कलाकार पुनरागमन करण्यात यशस्वीही ठरतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ‘निमरत कौर’ होय. निमरत बॉलिवूडमध्ये ५ वर्षांनंतर पुनरागमन करण्यासाठी उत्साही आहे. सन २०१३ साली रिलीझ झालेला ‘लंच बॉक्स’ फेम अभिनेत्री अभिषेक बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

निमरत ‘दसवीं’ या चित्रपटातून पुनरागमन करत असून तिला अभिषेकसह अभिनेत्री यामी गौतमबरोबरही काम करण्याची संधी मिळणार आहे.

आगरामध्ये अभिषेक आणि यामी यांनी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. लवकरच निमरतही शूटिंगला सुरुवात करणार आहे. जवळपास ५ वर्षे मोठ्या पडद्यापासून दूर असलेली निमरत २ आंतरराष्ट्रीय आणि एका देशांतर्गत सीरिजमध्ये काम करत होती.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, “इतक्या दीर्घ काळानंतर चित्रपटात काम करण्यासाठी उत्साही आहे. यासोबतच चिंताही आहे.” माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘दसवीं’ चित्रपटाची शूटिंग मध्यवर्ती कारागृहात होत आहे. चित्रपटाची प्रॉडक्शन टीम आगरामध्ये पोहोचली आहे. कारागृहात चित्रपटाचा सेटही तयार केला आहे.

काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या रिलीझ झालेल्या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चनचा दबंग लूक दिसत आहे. पोस्टरमध्ये तो बाली घातलेला दिसत आहे. त्याचा हा लूक जबरदस्त तर आहेच, सोबतच मजेशीरही आहे. असे म्हटले जात आहे की, हा एक विनोदी चित्रपट असेल.

‘दसवीं’ चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा करत आहेत. या चित्रपटापासूनच तुषार आपला दिग्दर्शनातील हात आजमावत आहेत. ‘स्त्री’, ‘बाला’ यांसारखे हिट चित्रपट बनवणारे दिनेश विजान या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

‘दसवीं’ या चित्रपटाची कहाणी एका दबंग नेत्याभोवती फिरत आहे, जो अशिक्षित आहे. यासोबतच त्याला आपल्या वाईट कामामुळे कारागृहात जावे लागते. कारागृहात नेत्याला शिस्तीचे धडे दिले जातात. तो आपल्या क्षमतेच्या जोरावर कारागृहातून दहावीचे शिक्षण पूर्ण करण्यात यशस्वी होतो.

विशेष म्हणजे सुपरस्टार अक्षय कुमारसोबत सन २०१६ मध्ये निमरत ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात झळकली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.