Sunday, June 8, 2025
Home मराठी ‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. प्रत्येक अभिनेत्रींमध्ये काहीतरी खास गोष्ट असते. यातीलच एक सुंदर आणि सालस अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियाने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. प्रत्येक भूमिकेमधील प्रियाचा लूक काहीतरी नवीन आणि सर्वांना आकर्षित करणारा असतो. त्यात तिच्या फॅशन सेन्सची तर सर्वत्र चर्चा चालू आहे. अशातच समस्त मराठी प्रेक्षकांना भुरळ घालणारा तिचा एक लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

प्रियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रियाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिने कानात मोठे रिंग्स घातले आहेत. तसेच केसांची पोनीटेल घातली आहे. या फोटोमध्ये ती खाली बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूप आकर्षक दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुम्ही मला टक लावून पाहत होता पण नेमके मी मागे वळून पाहिले.” तिचे चाहते या फोटोवर सातत्याने कमेंट करत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ‘वाव’ अशी कमेंट केली आहे.

प्रिया बापटच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘ऐका दाजीबा’, ‘पिंपळ’, ‘गच्ची’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘काकस्पर्श’, ‘टाइमप्लिज’, ‘टाईमपास २’, ‘आणि काय हवं’, ‘आम्ही दोघी’, ‘वजनदार’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘गुलाबजाम’ या चित्रपटात काम केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ वेबसिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. तसेच तिची ‘आणि काय हवं’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. यामध्ये ती तिचा पती उमेश कामतसोबत दिसत आहे. यामधील त्यांचे प्रेम, मस्ती प्रेक्षकांना खूप आवडत आहे. उमेश सध्या सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहे. (marathi actress priya bapat share her photo on social media)

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘धक धक गर्ल’च्या अदांनी पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका; लेटेस्ट फोटोशूटने केला इंटरनेटवर राडा

-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम

-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी

हे देखील वाचा