दुसऱ्या लाटेदरम्यान, कोरोनाच्या महाभयंकर रूपाचे दर्शन घडत आहे. दररोज हजारो प्रकरणं समोर येत आहेत, तसेच दरदिवशी हजारो निष्पाप जीव जात आहेत. मोठमोठे व्यक्ती आता मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. मात्र, तरीही सतत वाईट व नकारात्मक बातम्या कानावर पडत आहेत. या काळात एखादी सकारात्मक पोस्ट नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी मदत करते. नागरिकांनी खचून न जाता, धैर्य राखण्याचे आवाहनही चहूबाजूंनी केलं जातंय. अशा परिस्थितीत, मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्याद्वारे ती चाहत्यांना हिंमत देण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे.
सध्या अभिनेत्री ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत प्रिया सावित्रीबाई देशमुख म्हणजेच रायबागणची भूमिका साकारताना दिसत आहे. तिने शेअर केलेला हा व्हिडिओ याच मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रिया एका शत्रूसोबत लढताना दिसली आहे. तसेच ती शत्रूविरुद्ध जिंकतानाही दिसली आहे. यात तिने स्वतःला नागरिक, तर समोरच्या शत्रूला कोरोनाचा विषाणू समजत एक कॅप्शन लिहिले आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये प्रियाने लिहिले की, “आपण सर्वजण कोरोनासोबत जोरदार लढा देत आहोत आणि यात आपण जिंकलो ही आहोत. आता आशा फक्त इतकीच आहे की, हे यश सत्यात उतरावे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांना शक्ती मिळावी. जे संक्रमित झाले आहेत, त्यांनी लवकर बरे व्हावे.” आता प्रियाच्या या पोस्टला नेटकऱ्यांकडून बरीच पसंती मिळत आहे. कोरोनाच्या लढाईत विजय आपलाच होणार, असा संदेश तिने या पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर बऱ्याच हिंदी- मराठी मालिकेत काम करून प्रियाने आपली विशेष ओळख बनवली. तिने ‘या सुखांनो या’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदर्पण केले. त्यानंतर ती बऱ्याच मालिकेत झळकली. ‘तू तिथे मी’, ‘साथ निभाना साथीया’ अशा मराठी व हिंदी मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच ‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध मालिकेत काम करून, प्रिया बरीच लोकप्रिय झाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बधाई हो! सनी लिओनीच्या सुखी संसाराला १० वर्षे पूर्ण, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिल्या खास टिप्स