Saturday, August 1, 2026
Home साऊथ सिनेमा धाडस असावं तर असं! प्रिया निघाली भलतीच वॉरिअर, थेट वाघासोबत केले फोटोसेशन

धाडस असावं तर असं! प्रिया निघाली भलतीच वॉरिअर, थेट वाघासोबत केले फोटोसेशन

मागील काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे अभिनेत्री रातोरात स्टार बनली होती. ती अभिनेत्री इतर कुणी नसून प्रिया प्रकाश वॉरिअर ही आहे. प्रियाचा डोळे मारण्याचा एका व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. तिच्या या व्हिडिओला देशभरात खूप पसंती मिळाली होती. प्रिया अभिनयाव्यतिरिक्त तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशात तिचा एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरिअर (Priya Prakash Varrier) ही तिच्या नवीन व्हिडिओ आणि फोटोंमध्ये वाघासोबत वेळ घालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने जबरदस्त कॅप्शनही दिले आहे. तिने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज मी या भव्य प्राण्याला भेटले. जर तुम्ही परदेशात सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल, तर नक्कीच @pickyourtrail ला भेट द्या. आम्ही राहत असलेल्या सुंदर @pullmanfuketpanwa रिसॉर्टचा उल्लेख करायला मी कसे विसरू शकते.”

प्रिया प्रकाश वॉरिअर हिचा सोशल मीडियावर चांगलाच वावर आहे. ती यावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने यापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओ ती पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. प्रियाने या व्हिडिओत गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली होती. यासोबतच बॅकग्राऊंडमध्ये मोठमोठ्या इमारतीही दिसत आहेत.

प्रियाने या फोटोंना कोणतेही कॅप्शन दिले नव्हते. मात्र, यासोबत तिने एका फुलपाखराचा इमोजी वापरला होता. हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच तिच्या पोस्टवर 4 लाखांहून अधिक लाईक्सचा पाऊस पडला होता.

प्रियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘ओरू अदार लव्ह’, ‘चेक’, ‘इश्क’, ‘तनहा’, ‘विष्णू प्रिया’ यांसारख्या अनेक सिनेमात झळकली आहे. याव्यतिरिक्त तिच्या ताफ्यात ‘3 मंकीज’, ‘लव्ह हॅकर्स’ यांसारखे सिनेमे आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आरआरआर’ सिनेमाची क्रेझ सातासमुद्रापार, चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी ‘नाटो नाटो’वर लावले ठुमके
‘गॉडफादर’साठी कशी झाली सलमानची निवड? कास्टिंग काऊचचा उल्लेख करत सलमानचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा