प्रियांका चोप्राने ‘सिटाडेल’चे शूटिंग केले पूर्ण; फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट


बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra) व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला व्यस्त ठेवणे पसंत करते. प्रियांका सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्याचबरोबर तिच्या कामासंबधित माहिती देखील देत असते. प्रियांका सध्या खूप चर्चेत आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या प्रियांका या अभिनेत्रीने तिच्या बहुप्रतिक्षित आगामी ‘सिटाडेल’ (Citadel) या सीरिजचे शूटिंग पूर्ण केले आहे. प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना याची माहिती दिली आहे. महामारीच्या कठीण काळात या प्रोजेक्टवर काम करणे हे तिचे ‘मोस्ट इंटेंस वर्क’ असे तिने वर्णन केले आहे. प्रियांकाने ‘सिटाडेल’च्या रॅपअपची घोषणा करताना रिचर्ड मॅडन आणि इतरांसोबत सेटवरील काही बीटीएस फोटो देखील शेअर केले.

प्रियांकाने सिटाडेलचे शूटिंग केले पूर्ण 

‘सिटाडेल’च्या शूटिंगदरम्यान प्रियांका अनेकदा तिच्या कामाची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. या सीरिजमध्ये काम करणे हा प्रियांकासाठी खूप छान अनुभव होता, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. लंडनच्या कडाक्याच्या थंडीत रात्री उशिरा शूटिंग करण्यापासून ते वैयक्तिक आयुष्य सांभाळण्यापर्यंत प्रियांकाने खूप मेहनत घेतली आहे.

सीरिजचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर करण्यासोबत एक छान नोट देखील लिहिली आहे. प्रियांकाने लिहिले की, “हा ‘सिटाडेल’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. सर्वात तीव्र वेळेत वर्षभर सर्वात तीव्र काम. अशा शानदार लोकांशिवाय हे शक्य झाले नसते. आपण काही येथे पाहू शकता, तर काही नाही. हे कठीण होते, परंतु जेव्हा तुम्ही ही सीरिज पाहाल तेव्हा ती तुम्हाला पैसा वसूल करणारी वाटेल.”

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या हॉलिवूड चित्रपट ‘द मॅट्रिक्स रिसर्क्शन्स’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला, ज्यामध्ये प्रियांका चोप्राचा लूक खूप आवडला. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सिटाडेल’ हा प्रियांका चोप्राच्या सर्वात महत्त्वाच्या प्रोजेक्टपैकी एक आहे.

हेही वाचा :

खरंच की काय! नोरा फतेही ‘या’ गायकाला करतेय डेट? ‘हे’ फोटो पाहून चाहत्यांना आलीय शंका!

लाफ्टरक्वीन भारती सिंगची संपत्ती ऐकून डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, शोच्या एका भागासाठी घेते ‘इतके’ मानधन

Oops Moment! रेलिंगजवळ उभी राहून मौनी रॉय देत होती झक्कास पोझ, पण अचानक ड्रेसने केली पंचायत!


Latest Post

error: Content is protected !!