Oops Moment! रेलिंगजवळ उभी राहून मौनी रॉय देत होती झक्कास पोझ, पण अचानक ड्रेसने केली पंचायत!


टेलिव्हिजनची ‘नागिन’ म्हणून प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. तिची बोल्ड स्टाईल नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. पण कधीकधी तिची बोल्डनेस तिलाच महागात पडलेली पाहायला मिळते.

पातळ कापडाने केली पंचायत!
नुकतेच मौनी रॉयने तिच्या नवीन ड्रेसमधील लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत होती. हे फोटो शेअर करताना मौनी रॉयने एवढी मोठी चूक केली की, ती उप्स मुमेंटची (Oops Moment) बळी ठरली. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मौनीच्या ड्रेसचे कापड इतके पातळ आहे की, तिच्या आतील कपडेही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अशाप्रकारे मौनी उप्स मुमेंटची बळी ठरली. (mouni roy new backless gown oops moment)

स्वतः शेअर केले फोटो
स्वतः अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत अभिनेत्रीने एक कॅप्शनही लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये।लिहिले आहे की, “रेड लिपस्टिक ऑप्शनल.”

साध्या लूकमध्येही दिसतेय कमाल!
मौनीने तिच्या नवीन ड्रेसमधील लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या अदा अतिशय मनमोहक आहेत. या ड्रेसमुळे मौनीने आपला लूक अगदी साधा ठेवला आहे. अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडून, लाल लिपस्टिक लावली आहे. यामध्ये तिची स्टाइल पाहून कोणीही वेडे होईल.

मौनीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मधून केली होती. त्यानंतर ती ‘कस्तुरी’, ‘देवों के देव महादेव’, ‘नागिन’, ‘नागिन २’, ‘टशन-ए-इश्क’, ‘जुनून’, ‘ऐसी नफरत तो कैसा इश्क’, ‘कृष्णा चली लंडन’, ‘झलक दिखला जा ९’, ‘एक था राजा एक थी रानी’मध्ये दिसली. मात्र, कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ या मालिकेत अभिनेत्रीला चांगलीच पसंती मिळाली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!