खरंच की काय! नोरा फतेही ‘या’ गायकाला करतेय डेट? ‘हे’ फोटो पाहून चाहत्यांना आलीय शंका!


काही काळापूर्वी नोरा फतेही (Nora Fatehi) आणि गायक गुरू रंधावा (Guru Randhava) यांचे ‘नाच मेरी राणी’ (Nach Meri Rani) हे गाणे रिलीझ झाले होते, जे खूप पसंत केले गेले. दरम्यान नोरा फतेही आणि गुरू रंधावा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. खरंतर, दोन्ही कलाकारांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, त्यामुळे त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

इंटरनेटवर व्हायरल होतायेत फोटो
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नोरा आणि गुरू गोव्याच्या बीचवर मस्ती करताना दिसत आहेत. यात दोघांचे कमालीचे बाँडिंग दिसत आहे. फोटोमध्ये गुरू प्रिंटेड शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे, तर नोरा क्रॉप टॉप आणि काळ्या शॉर्ट्समध्ये दिसत आहे. मात्र, गुरू रंधावा सध्या ‘द बँग टूर’साठी दुबईत आहे. तर हे फोटो जुने असल्याचे म्हटले जात आहे. पण गुरू आणि नोराचे हे व्हायरल झालेले फोटो पाहून, चाहत्यांकडून दोघे एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज बांधला जात आहे. (nora fatehi and guru randhawa photos from goa beach viral)

दोघे एकमेकांना डेट करत आहेत का?
दोघांचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडिया युजर्सचे असे म्हणणे आहे की, नोरा फतेही आणि गुरू रंधावा एकमेकांना डेट करत आहेत. एका युजरने लिहिले, “दोघे डेटिंग करत आहेत?’ आणखी एकाने कमेंट केली की, “गुरू रंधवाच्या पुढच्या गाण्याचे शूटिंग सुरू आहे.” तर कोणीतरी लिहिलंय की, “चला पंजाबला दुसरी परजाई मिळाली.” एका युजरने लिहिले, “नवीन जोडपे?” अशा प्रकारे युजर्स दोघांच्या डेटिंगबद्दल कमेंट करत आहेत.

लोकप्रिय झालं होतं गाणं
दुसरीकडे, काही युजर्सचे म्हणणे आहे की, गुरू रंधावा आणि नोरा फतेही त्यांच्या नवीन गाण्याच्या शूटिंगसाठी गोव्यात पोहोचले आहेत. मात्र, इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या फोटोंवर दोघांपैकी एकानेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गुरू रंधावा आणि नोरा फतेही यांचे ‘नाच मेरी राणी’ हे गाणे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले होते. या गाण्याला गुरू रंधावाने आपला आवाज दिला, तर नोरा फतेहीने यात धमाकेदार डान्स केला.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!