Saturday, April 20, 2024

‘या’ सिरीजमधून रवीना टंडन करणार डिजिटल पदार्पण, ‘मिस्ट्री-थ्रिलर’ने भरलेला टीझर झाला लॉन्च

अभिनेत्री रवीना टंडन लवकरच रुपेरी पडदा सोडून डिजीटलच्या दुनियेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. रसिक प्रेक्षक तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात रवीना आता डिजिटलमध्ये उडी घेण्यास सज्ज झाली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत, तिच्या पहिल्या वेब सिरीजची माहिती चाहत्यांना दिली आहे. तिने ‘अरण्यक’ वेब सिरीजच्या टिझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, सुरुवातीला दाट झाडीमधून एक गाडी जात आहे. त्यानंतर अंधारात आणि घनदाट जंगलात रवीना येते. ती कोणाला तरी शोधत असते. तेवढ्यात तिला आशुतोष राणा दिसतात. ती त्यांना आवाज देते तितक्यात ते तिच्यावर बंदूक रोखतात आणि दोघांचे डायलॉग सुरू होतात. आशुतोष म्हणतात, “मैंने कहा था ना कल चंद्र ग्रहण की रात थी. वो खून पीने आता है.” रवीना म्हणते “मैने सूना नही.” त्यावर ते म्हणतात “कोई नहीं, अब देख ले.” या सर्वांमध्ये आणखी एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन कोणाला तरी शोधत असतो. त्याच्या हातात देखील बंदूक असते. तसेच मध्ये मध्ये एका भयानक जंगली प्राण्याचा आवाज येत असतो. संपूर्ण टिझरमध्ये एवढा सस्पेन्स आहे की, प्रेक्षकांची वेब सिरीज पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा व्हिडियो शेअर करत, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “डोळ्यांनी गोळ्या मारायला पुन्हा आले आहे मी, पण यावेळी मिस्टिरियस थ्रिलर, ‘अरण्यक’ बरोबर.” (Actress Raveena Tandon digital debut in new web series aranyak with Ashutosh Rana)

ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. तसेच टिझरचा प्रीमियर शनिवारी सायंकाळी नेटफ्लिक्सच्या ग्लोबल इंवेट ‘टुडुम’वर प्रदर्शित झाला. यामध्ये परमब्रत चटर्जी देखील आहेत. तसेच रॉय कपूर फिल्म्स आणि रमेश सिप्पी एंटरटेनमेंट यांनी ही सिरीज प्रोड्यूस केली आहे. विनयण वैकुलने याचे दिग्दर्शन केले आहे.

या वेब सिरीजमध्ये रवीना कस्तूरी नावाचे पात्र साकारणार आहे. तिने एका शोमध्ये सांगितले होते की, “मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, असे काही मला दाखवायचे नाही, पण माझी पुढे जाण्याची धडपड सुरू आहे. दिलेले पात्रच असे आहे की, त्याने मला खूप मजबूत बनवले आहे.”

अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर दमदार अभिनय केलेला आहे. आता डिजिटलमध्ये ती कसे काम करणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य

हे देखील वाचा