Thursday, June 25, 2026
Home साऊथ सिनेमा समंथा रुथने गोड बातमी शेअर करत मॅटर्निटी ब्रेकची केली घोषणा

समंथा रुथने गोड बातमी शेअर करत मॅटर्निटी ब्रेकची केली घोषणा

समंथा रुथ प्रभू हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमधुन आपले स्थान निर्माण करुन प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली आहे. तसेच ती आता कोणत्या चित्रपटामुळे चर्चेत नाही तर ती तीच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे तिने नुकतेच एक गोड बातमी शेअर केली आहे. हि बातमी म्हणजे ती आता पहिल्यांदाच आई होणार आहे. काही दिवसापासुन ती गरोधर असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र तीने आता ही बातमी स्वत:च शेअर केली आहे. 

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिचे सध्याचे प्रकल्प पूर्ण केल्यानंतर ती कामातून काही काळ विश्रांती घेणार आहे. तिने तिच्या मॅटर्निटी लीव्हची घोषणा केली आहे. तर तिने म्हणले आहे कि  त्यानंतर, मी माझ्या चाहत्यांसाठी आणखी एका चित्रपटासह परत येईन.” या व्हिडिओमध्ये, कार्यक्रमादरम्यान मंचावर समंथाच्या शेजारी राज निदिमोरू बसलेले दिसत आहेत.

दिग्दर्शिका नंदिनी (Nandini) रेड्डी यांनीही ‘मा इन्टी बंगरम’च्या यशाबद्दल चर्चा करताना अभिनेत्रीच्या गर्भधारणेचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “तिच्या गर्भधारणेची वेळ आणि आमचा ‘मा इन्टी बंगरम’ हा चित्रपट हिट ठरण्याची वेळ यांचा अतिशय सुंदर योगायोग जुळून आला आहे.” दिग्दर्शिकेने पुढे सांगितले की, त्यांनीच समंथाच्या या यश सोहळ्यातील उपस्थितीचे नियोजन केले होते, याच कार्यक्रमादरम्यान चर्चाना उधान आले आणि तिने हि बातमी जाहीर करुन टाकली आहे. तर समंथा रुथ प्रभू या गोड बाळाच्या आगमानासाठी उत्सुक आणि आंनदी असल्याचे दिसत आहे.

4 दिवसात कॉकटेल 2चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, 85 कोटी रुपयांचा गाठला टप्पा

हे देखील वाचा