चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना त्यांची ओळख मिळाली आहे. प्रत्येक वेळेस एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे ही नागराज मंजुळे यांची खासियत. अशीच एक आगळीवेगळी प्रेम कहाणी असलेला चित्रपट ज्याने मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते, तो चित्रपट म्हणजे ‘सैराट’.
या चित्रपटातून एक जोडी मात्र खूप लोकप्रिय झाली, ती म्हणजे आर्ची आणि परश्या. ही पात्र अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी निभावली होती. या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. दोन्हीही कलाकार आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात व्यस्त आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने दिवाळी निमित्त अनेक फोटो शेअर केले होते. अशातच तिचा आणखी एक नवा लूक समोर आला आहे. (Actress rinku rajguru share her bridal look photos on social media)
रिंकूने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने ब्रायडल मेकअप केला आहे. त्यामुळे ती अगदी एखाद्या नव्या नवरीप्रमाणे दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाचा सुंदर लेहंगा घातला आहे. तिने गळ्यात नेकलेस कानात ईअरींग आणि बिंदी लावली आहे. या लूकमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने तोंडावर ओढणी घेऊन पोझ दिली आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा ब्रायडल लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर प्रसाद ओक याने छान अशी ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच तिच्या एका चाहत्याने “वाह एकदम जबरदस्त अशी कमेंट केली आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत २० हजारापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिझनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो










